योगी सरकारची 8 वर्षे! 227 गुन्हेगारांचा एन्काउंटरमध्ये, 1 लाखांवर कारवाई; 58 हजार तुरुंगात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:11 IST2025-04-10T18:10:54+5:302025-04-10T18:11:48+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार राज्यभरात 'दस का दम' नावाचे विशेष ऑपरेशन राबवण्यात आले.

8 years of Yogi government! 227 criminals killed in encounter, action taken against 1 lakh; 58 thousand in jail... | योगी सरकारची 8 वर्षे! 227 गुन्हेगारांचा एन्काउंटरमध्ये, 1 लाखांवर कारवाई; 58 हजार तुरुंगात...

योगी सरकारची 8 वर्षे! 227 गुन्हेगारांचा एन्काउंटरमध्ये, 1 लाखांवर कारवाई; 58 हजार तुरुंगात...

UP News : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आठ वर्षे पुर्ण झाली आहेत. या आठ वर्षांत सरकारने गुन्हेगारांविरोधात 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी अवलंबली आहे. या काळात एक लाखांहून अधिक गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले आहे, तर 227 जणांना चकमकीत ठार करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर योगी सरकारच्या सूचनेनुसार, मिशन शक्ती फेज-5 अंतर्गत राज्यभरात 'दस का दम' नावाचे विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये ऑपरेशन गरुड, ईगल, मजनू, रक्षा, बचपन, खोज, शील्ड, डिस्ट्रॉय, व्यसनमुक्ती आणि त्रिनेत्र इत्यादींचा समावेश आहे. या ऑपरेशन्सद्वारे यूपी पोलिसांनी महिला, मुली, मुले, तरुण आणि समाजातील कमकुवत घटकांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. 

डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इच्छेनुसार, मिशन शक्ती फेज-5 अंतर्गत यूपी पोलिसांनी राज्यभरात दहा ऑपरेशन्स राबवले. यूपी पोलिसांची ही मोहीम गुन्हेगारांसाठी मृत्युघंटा बनली आहे. योगी सरकारचे दस का दम ऑपरेशन ही राज्याला गुन्हेगारीमुक्त करण्याची संकल्पना आहे, जी यशस्वीरित्या अंमलात आणली गेली आहे. या कारवाईंद्वारे एक लाखांहून अधिक लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, ऑपरेशन त्रिनेत्र अंतर्गत राज्यभरात संवेदनशील ठिकाणे ओळखण्यात आली. यानंतर, राज्यभरात 11,07,782 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. कॅमेरा नियंत्रण कक्षांमधून घटनांवर त्वरित कारवाई व्हावी यासाठी हे सीसीटीव्ही पोलिस ठाण्यांना जोडले गेले होते. याचा परिणाम असा झाला की, दरोडा आणि लूटमारीसह एकूण 5,718 जघन्य गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करण्यात आली.

याशिवाय, ऑपरेशन मजनूने मुली आणि महिलांची सुरक्षा सुनिश्चित केली. याद्वारे 58,624 जणांना अटक करण्यात आली. तर, महिला आणि मुलींशी संबंधित सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ऑपरेशन गरुड' सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 2,597 एफआयआरची चौकशी करण्यात आली, त्यापैकी 2,407 निकाली काढण्यात आल्या. बाल हक्कांचे रक्षण करण्यासाठी ऑपरेशन बचपन आणि खोज आयोजित केले गेले. बालमजुरी आणि बाल भीक मागणे यासह बाल हक्कांसाठी राज्यात ऑपरेशन बचपन आणि खोज राबवण्यात आले. ऑपरेशन बचपन अंतर्गत, बालमजुरी आणि बाल भीक मागण्याच्या प्रकरणांमधून 2,860 मुलांना वाचवण्यात आले. त्याचप्रमाणे, ऑपरेशन खोज अंतर्गत, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि निवारा गृहांमधून 3,327 बेपत्ता मुलांचे पुनर्वसन करण्यात आले.
 

Web Title: 8 years of Yogi government! 227 criminals killed in encounter, action taken against 1 lakh; 58 thousand in jail...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.