कस्टम्स गोदामातून ८० किलो सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 04:22 AM2016-08-30T04:22:48+5:302016-08-30T04:22:48+5:30
सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) गेल्या चार वर्षांत तस्करांकडून पकडलेले आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोदामात ठेवलेले ८० किलो सोने लंपास केले
नवी दिल्ली : सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) गेल्या चार वर्षांत तस्करांकडून पकडलेले आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोदामात ठेवलेले ८० किलो सोने लंपास केले गेल्याचे उघड झाले असून, केंद्रीय वित्त मंत्रालयाने याचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे सोपविण्याचे ठरविले आहे.
कस्टम्स विभागाने परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून हे सोने सन २०१२ पासून यंदाच्या जूनपर्यंत विविध वेळेला हस्तगत केले होते. ते विमानतळावरील गोदामात एका सुरक्षित ‘व्हॉल्ट’मध्ये ठेवण्यात आले होते. ताब्यात घेतलेले हे सोने चिपा, बिस्किटे व दागिन्यांच्या स्वरूपात होते आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचे मूल्य २५ कोटी रुपये होते, असे अधिकृत सूत्रांंकडून सांगण्यात आले.
अलिकडेच कस्टम्स अधिकाऱ्यांनी हे ‘व्हॉल्ट’ उघडले, तेव्हा मूळच्या सोन्याच्या जागी तेथे पिवळ््या रंगाचा दुसराच हलका धातू ठेवला असल्याचे निदर्शनास आले. हे सोने एकाच वेळी लंपास झालेले नाही तर वेगवेगळ््या वेळी काढून घेण्यात आले आणि त्याऐवजी तेवढ्याच वजनाचा हलका धातू ठेवण्यात आला. याआधी अशा घटना निदर्शनास आल्या, तेव्हा दिल्ली पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यात आली होती. परंतु हे प्रकार वारंवार आणि पद्धतशीर घडत असल्याचे दिसून आल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आता या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यास संमती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याआधी एका ‘आरटीआय’ अर्जाच्या उत्तरात विमानतळावरील गोदामात ठेवलेले सहा कोटी रुपयांचे २३ किलो सोने गायब झाल्याची माहिती दिल्ली कस्टम्सने दिली
होती.
आमच्याकडे पायाभुत सुविधा नाहीत, भ्रष्टाचार आहे, अशा पळवाटा शोधणे बंद करून आम्ही उसेन बोल्ट याच्याकडून धडा घ्यायला हवा. उसेनप्रमाणेच आमच्या खेळाडूंनीही यशाचा मार्ग आणि साधने शोधली पाहिजेत, एवढे मला म्हणायचे होते. भारतात खेळाडूंसाठी सुविधांची अजिबात वानवा नाही, असाही दावा त्यांनी केला. जमैका आणि केनियाच्या तुलनेत भारत क्रीडा क्षेत्रावर प्रचंड पैसा खर्च करते, असेही उदित राज यांनी म्हटले.