सीमेवर आढळला 80 मीटर लांब बोगदा
By admin | Published: April 26, 2017 06:33 AM2017-04-26T06:33:27+5:302017-04-26T06:33:27+5:30
सीमा सुरक्षा दलाला चोपडा-फत्तेपूर सीमा चौकीजवळ 80 मीटर लांब बोगदा आढळला
Next
>ऑनलाइन लोकमत
किशनगंज (बिहार), दि. 26 - सीमा सुरक्षा दलाला चोपडा-फत्तेपूर सीमा चौकीजवळ 80 मीटर लांब बोगदा आढळला आहे. बीएसएफचे उपमहानिरीक्षक देवी शरणसिंह यांनी विभागीय मुख्यालयात याबाबत माहिती दिली. या बोगद्याबाबत माहिती मिळाल्यापासून सीमेवर सुरक्षा चोख करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
चहाच्या एका शेतातून हा बोगदा सीमेवर लावण्यात आलेल्या कुंपनाखालून जात होता. जनावरांच्या तस्करीसाठी हा बोगदा तयार करण्यात आल्याचा बीएसएफच्या अधिका-यांना संशय आहे. या बोगद्यातून बांगलादेशमध्ये जनावरांची तस्करी करण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खोदकाम सुरु असताना संशय आल्याने तपासणी केली असता हा बोगदा आढळला. जनावरांच्या तस्करीसाठी बोगदा तयार करण्यात येत असल्याचा संशय देवी शरणसिंह यांनी व्यक्त केला आहे.