80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक आहेत - पंतप्रधान मोदी
By admin | Published: August 6, 2016 05:55 PM2016-08-06T17:55:39+5:302016-08-06T18:41:06+5:30
रात्री गोरखधंदे करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात असा थेट आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना थेट लक्ष्य केले आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - रात्री गोरखधंदे करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात असा थेट आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना थेट लक्ष्य केले आहे. गोरक्षकांनी गेल्या काही महिन्यांत केलेल्या हल्ल्यांवर प्रथमच मौन सोडत मोदींनी राज्यसरकारांनी अहवाल बनवावेत, त्यामध्ये 80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळेल असे सांगितले. गोसेवा करायची असेल तर गाईला प्लास्टिक खाण्यापासून थांबवा कारण कत्तलीपेक्षा जास्त गायी प्लास्टिक खाऊन मरतात असे त्यांनी सांगितले.
देशातल्या प्रत्येक वाईट घटनेसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरलं जातं अशी खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रकार राजकीय सोय म्हणून किंवा टीआरपी मिळवण्यासाठी केला जातो असा आरोप केला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMO मोबाईल अॅप लाँच करण्यात आले, यावेळी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्समधून त्यांनी संवाद साधला.
गुड गव्हर्नन्स किंवा सुप्रशासनाला महत्त्व देताना याच्याच आधारे सर्वसामान्य माणसांच्या समस्या सुटतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. भारत जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगताना, पुढील 30 वर्षे 8 टक्क्यांच्या गतीने अर्थव्यवस्था वाढली तर जगातील प्रत्येक उत्कृष्ट गोष्ट भारतीयांच्या पायाशी असेल असे ते म्हणाले. जपानची मारूति भारतात येते आणि जपानलाच एक्स्पोर्ट करते त्यावेळी भारताचा विकास होतो, त्यामुळे भारताने या दिशेने जायला हवं असं ते म्हणाले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
कत्तल करणाऱ्यांपेक्षा प्लास्टिक खाण्यामुळे गाई मरतात. दुसऱ्यांना त्रास देऊन गायीची सेवा होत नाही.
काहीजण रात्री समाजकंटक असतात, आणि दिवसा गोरक्षक बनतात. राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांची माहिती काढावी, असं लक्षात येईल की 70 ते 80 टक्के गोरक्षक हे रात्री गोरखधंदे करतात नी दिवसा गोरक्षकचा मुखवटा घालतात.
- गोरक्षकाच्या नावावर अनेक जण दुकानं उघडून बसली आहेत, त्यांच्याकडे बघून मला चीड येते.
- बाबासाहेब आंबेडकरांना दलित असल्यामुळे भारतात खूप त्रास भोगावा लागला, त्यांना विदेशामध्ये खूप मान मरातब मिळाला, परंतु तरीही ते भारतात परत आले , देशाची सेवा करण्यासाठी... असा सेवा भाव असायला हवा.
- खादी फॉर नेशन आणि खादी फॉर फॅशन हे आपलं तत्व असायला हवं.
- खादीचा वाढता वापर गरीबांच्या व ग्रामीण भारताच्या जीवनात बदल घडवेल. आपल्या एकूण कापडाच्या वापरापैकी 5 टक्के वापर खादीचा झाला तरी गरीबांचं आयुष्य बदलेल.
- शहरांमध्ये असलेल्या प्रत्येक सोयीसुविधा गावांमध्ये मिळायला हव्यात. ग्रामीण अर्थव्यवस्थाही ही वेगाने वाढायला हवी.
- जाहिरातींवर प्रचंड खर्च करण्यात आला, तरीही अनेक लहान मुलांचं लसीकरण झालं नसल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं. त्यामुळे आता आरोग्य विभाग पुढाकार घेऊन घराघरात पोचण्याचा प्रयत्न करत आहे.
- पर्यटन क्षेत्रामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
- एखाद्या पदावरील जबाबदार व्यक्तिला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकांना हवा. लोकांना जे हवंय ते त्यांना मिळायला हवं.
- अनेक समस्या या गुड गव्हर्नन्स किंवा सुप्रशासनानं सुटतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
- गुड गव्हर्नन्स किंवा सुप्रशासन यावर भर दिला तर सर्वसामान्य माणसाचं जीवन सुधारेल.
- पर्यटन क्षेत्रामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
- वैद्यकीय उपचारांमध्ये कमालीची वाढ झाली, परंतु आजारांमध्ये वाढ झाली आहे. आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत.
- स्वच्छता अभियान ही आरोग्य चांगलं राखण्याचा मार्ग आहे, त्यामुळे मी स्वच्छतेवर भर देत आहे.