आयएएस अधिका-याकडे सापडलं 800 कोटींचं घबाड

By admin | Published: April 30, 2016 03:13 PM2016-04-30T15:13:06+5:302016-04-30T16:44:25+5:30

एसीबीने वाहतूक विभागाचे उपायुक्त आयएएस अधिकारी ए मोहन यांच्या संपत्तीवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्ब्ल 800 कोटींचं घबाड एसीबीने जप्त केलं आहे

800 crore frauds found by IAS officer | आयएएस अधिका-याकडे सापडलं 800 कोटींचं घबाड

आयएएस अधिका-याकडे सापडलं 800 कोटींचं घबाड

Next
ऑनलाइन लोकमत - 
हैदराबाद, दि. 30 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या छापेमारीत आयएएस अधिका-याकडे सापडलेली संपत्ती ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एसीबीने परिवहन विभागाचे उपायुक्त आयएएस अधिकारी ए मोहन यांच्या संपत्तीवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्ब्ल 800 कोटींचं घबाड एसीबीने जप्त केलं आहे. ए मोहन यांच्या आंधप्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकमधील ठिकाणांवर छापेमारी करत ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 
 
एसीबीने ए मोहन यांना अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे. एसीबीने सलग दोन दिवस केलेल्या छापेमारीत ही सगळी मालमत्ता जप्त केली आहे. ए मोहन यांच्या घरात हिरे तसंच मौल्यवाने खडेदेखील सापडले आहेत. ए मोहन यांच्या बँकेतील लॉकरची तपासणी अद्याप  सुरु आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.
 

Web Title: 800 crore frauds found by IAS officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.