Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:35 PM2024-11-25T14:35:46+5:302024-11-25T14:36:44+5:30

Arvind Kejriwal : २४ तासांत यासाठी १० हजार अर्ज प्राप्त झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

'80,000 more people to get old-age pension,' announces Arvind Kejriwal ahead of Delhi polls | Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!

नवी दिल्ली : दिल्लीत आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी खेळी केली आहे. आता दिल्लीतील आणखी ८० हजार वृद्धांना दरमहा २००० रुपये पेन्शन मिळणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील वृद्धांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. तसेच, २४ तासांत यासाठी १० हजार अर्ज प्राप्त झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री आतिशी आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले, "दिल्लीत ८० हजार वृद्धापकाळ पेन्शन सुरू होत आहेत. २०१५ मध्ये आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हा ३.३२ लाख वृद्धांना पेन्शन मिळत होती. आम्ही ती वाढवून जवळपास ४.५० लाख रुपये केली. आता आणखी ८० हजारांची वाढ होत आहे. अनेक वर्षांपासून वृद्धांची पेन्शन बंद होती. मी जिथे जात होतो, तिथे वृद्ध पेन्शन सुरू करण्याची मागणी करत होते."

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, केवळ मंत्रिमंडळाने ते पारित केले नाही तर दिल्ली सरकारनेही त्याची अंमलबजावणी केली आहे. कालपासून यासंबंधीचे पोर्टल कार्यान्वित झाले आहे. २४ तासांत १० हजार अर्ज आले आहेत.  दिल्लीत ६० ते ६९ वयोगटातील वृद्धांना दरमहा २००० रुपये पेन्शन मिळते. ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना २५०० रुपये पेन्शन मिळते, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

याचबरोबर, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांशी भाजपची तुलना करत अरविंद केजरीवाल यांनी भाजपची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, डबल इंजिनमध्ये ५००-६०० रुपये, सिंगल इंजिनमध्ये २५०० रुपये दरमहा मिळतात. डबल इंजिनचे सरकार निवडून आणले तर नुकसान होईल. त्यामुळे आम आदमी पक्षाचे इंजिन चालू ठेवा, सर्व काही ठीक चालले आहे. तसेच, तुरुंगात गेल्यावर वृद्धांची पेन्शन बंद करण्यात आली होती. पण, बाहेर पडताच सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या वृद्धांच्या आशीर्वादानेच आपण तुरुंगाबाहेर पडलो, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
 

Web Title: '80,000 more people to get old-age pension,' announces Arvind Kejriwal ahead of Delhi polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.