देशात ८१ लाख किशोरांचे झाले लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:41 AM2022-01-05T05:41:14+5:302022-01-05T05:41:25+5:30
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातेत सर्वाधिक
- नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात १५ ते १७ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मात्रा देण्याची मोहीम सोमवारी सुरू झाली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या सोमवारच्या संख्येच्या तुलनेत दोनपट झाली. त्यात महाराष्ट्रातील ४.३ लाख मुलांचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत देशात १५ से १७ वयोगटातील ८१.५ लाखांपेक्षा जास्त मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.
गुजरातेत १०.७२ लाख मुलांनी लस घेतली. मंगळवार संपताना ही संख्या मध्य प्रदेशमध्ये ९.७८ लाख, कर्नाटकमध्ये ७.७३ लाख आणि उत्तर प्रदेशमध्ये ४.३१ लाख झाली.
महाराष्ट्रात ४.२६ लाख, बिहारमध्ये ४.०९ लाख, पश्चिम बंगालमध्ये २.७३ लाख मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली.
आकडे बोलतात...
n मंगळवारी ३९.८५ लाख मुलांनी कोविन पोर्टलच्या माध्यमातून नावे नोंदवली होती. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत देशात एकूण १४७.६६ कोटी लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. त्यात ८६.०६ पहिली तर ६१.६० कोटी दुसरी मात्रा आहे.
n आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण १३.५५ लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत. राज्यात ५.४५ कोटी लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. ८.०९ कोटी लोकांनी दुसरी मात्रा घ्यायची
आहे.
देशात ५०० हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची बाधा
देशातील विविध महाविद्यालयांत शिकणारे वैद्यकीय विद्यार्थी तसेच रुग्णालयांतील डॉक्टर असे मिळून सुमारे ५०० जणांना गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याशिवाय अनेक शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे यांतील विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने पालक घाबरून गेले.
केजरीवाल बाधित होताच नेत्याचे वादग्रस्त ट्विट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, भाजपचे दिल्लीतील नेते कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोरोना संसर्गाचे राजकारण केले आहे. तुम्ही गाेवा, पतियाळा, लखनाैमध्ये जाऊन पाप करून आला आहात. तुम्ही आता सुपर स्प्रेडर आहात, असे ट्विट त्यांनी केले. केजरीवाल नुकतेच गाेवा, पंजाब व उत्तरप्रदेशचा दौरा करून परतले आहेत.