हैदराबादेत ईडीच्या धाडीत ८२ कोटींचे सोने केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:10 AM2019-04-19T04:10:21+5:302019-04-19T04:10:33+5:30
एक ज्वेलर्स समूह आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकून ८२ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे १४६ किलो सोने जप्त केले आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतरच्या पैशांच्या हेराफेरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हैदराबादेतील एक ज्वेलर्स समूह आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकून ८२ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे १४६ किलो सोने जप्त केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सांगितले की, हैदराबाद आणि विजयवाडामध्ये मुसद्दीलाल ज्वेलर्सचे शोरूम, त्यांचे प्रवर्तक कैलाश गुप्ता, बालाजी गोल्ड ग्रुपचे पार्टनर पवन अगरवाल, अन्य एक कंपनी आस्था लक्ष्मी गोल्ड, तथा त्याचे प्रवर्तक नील सुंदर थराड आणि चार्टर्ड अकाऊंटंट संजय शारदा यांच्या ठिकाणांवर मागील काही दिवसांत धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात ८२.११ कोटी रुपयांचे १४५.८९ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.