बलसागर भारत होवो! हवाई दलाची ताकद वाढणार; ८३ तेजस विमानं ताफ्यात सामील होणार
By कुणाल गवाणकर | Published: January 13, 2021 06:07 PM2021-01-13T18:07:59+5:302021-01-13T18:08:41+5:30
मोदी सरकारनं केला ४८ हजार कोटी रुपयांचा करार
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. लवकरच हवाई दलात ८३ तेजस विमानं सामील होणार आहेत. यासाठी संरक्षणाशी संबंधित कॅबिनेट कमिटीनं (सीसीएस) ४८ हजार कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएसनं कराराल मंजुरी दिल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. या करारामुळे हवाई दल अधिक सुसज्ज होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तेजस विमानं हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रं डागू शकतात. या विमानांमधून जहाजविरोधी क्षेपणास्त्रं, बॉम्ब आणि रॉकेटदेखील डागली जाऊ शकतात. तेजस विमानांच्या निर्मितीसाठी ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के ऍल्युमिनियम एलॉय आणि टायटॅनियमचा वापर केला जातो. तेजस चौथ्या पिढीतलं टेललेस कंपाऊंट डेल्टा विमान आहे. चौथ्या पिढीतल्या लढाऊ विमानांचा विचार केल्यास त्यात तेजस सर्वात हलकं आणि लहान आहे. भारतीय हवाई दलानं तेजस विमानं पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर तैनात केली आहेत.
The CCS chaired by the PM today approved the largest indigenous defence procurement deal worth about Rs 48,000 Cr to strengthen IAF’s fleet of homegrown fighter jet ‘LCA-Tejas’. This deal will be a game-changer for self-reliance in Indian defence manufacturing: Defence Minister pic.twitter.com/P7knIh9LWF
— ANI (@ANI) January 13, 2021
तेजस विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्तान एरॉनिटॉक्स लिमिटेडनं आधीच नाशिक आणि बंगळुरूत आवश्यक सोयीसुविधांची उभारणी केली असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. नव्या करारामुळे भारतीय हवाई दल अधिक सशक्त होईल आणि रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.