गोव्यात 83 टक्के, पंजाबमध्ये 70 टक्के मतदान

By admin | Published: February 4, 2017 08:05 AM2017-02-04T08:05:30+5:302017-02-04T18:34:31+5:30

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पाडले. दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले.

83 per cent in Goa, 70 per cent voting in Punjab | गोव्यात 83 टक्के, पंजाबमध्ये 70 टक्के मतदान

गोव्यात 83 टक्के, पंजाबमध्ये 70 टक्के मतदान

Next

 ऑनलाइन लोकमत

चंदीगड/पणजी, दि. 4 - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पाडले. दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. गोव्यामध्ये मतदान संपले असून, एकूण 83 टक्के मतदान झाले. गोवा विधानसभेमध्ये 40 जागा आहेत. गोव्यामध्ये सत्ता कायम राखण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. 
 
सध्या केंद्रात संरक्षणमंत्री असलेले गोव्याचे  नेते मनोहर पर्रिकर यांनी सत्ता कायम राखण्यासाठी प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. गेल्या वेळी झालेल्या 84% मतदानाचा विक्रम यावेळी मोडीत निघेल, अशी प्रतिक्रिया पर्रिकर यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली होती. भाजपाचा दोन तृतीयांश मताने विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 
 
गोव्यात भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सत्तेच्या स्पर्धेत आहे. शिवसेनाही गोव्यात प्रथमच स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गोव्यामध्ये 40 जागांसाठी एकूण 251 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच, शिवसेना आणि मगोपने महायुती केली आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी भाजपासाठी जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे.
 
पंजाब 
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले.  पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाची युतीने लागोपाठ तिस-यांदा सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाब विधानसभेमध्ये एकूण 117 जागा आहेत. 2012 मध्ये भाजपा-अकाली दल आघाडीने लागोपाठ दुस-यांदा सत्ता मिळवली होती. पंजाबमध्ये भाजपा-अकाली दल आघाडी, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सत्तेच्या स्पर्धेत आहे.  पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1145 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.  
 
 
 
LIVE UPDATE : मतदानाची टक्केवारी
उत्तर गोव्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 16 टक्के मतदान तर दक्षिण गोव्यात 14 टक्के मतदान झाले असून एकूण मतदान 15 टक्के झाले आहे. 
 
पंजाब विधानसभा निवडणूक : सकाळी 10.30 वाजेपर्यंत 12 टक्के मतदान 

Web Title: 83 per cent in Goa, 70 per cent voting in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.