'या' लालसेपोटी 83 वर्षाच्या वृद्धाने 30 वर्षाच्या मुलीबरोबर केले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:12 PM2018-02-20T12:12:26+5:302018-02-20T12:38:30+5:30
सुकराम बैरवा या 83 वर्षाच्या वृद्धाने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीबरोबर लग्न केले. बैरवाचे हे दुसरे लग्न आहे. या लग्नासाठी आसपासच्या 12 गावातून पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
जयपूर - कुटुंबाला वारस हवा म्हणून राजस्थानात राहणाऱ्या सुकराम बैरवा या 83 वर्षाच्या वृद्धाने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीबरोबर लग्न केले. बैरवाचे हे दुसरे लग्न आहे. वडिलोपार्जित संपत्तीची देखभाल करण्यासाठी मुलगा हवा म्हणून 83 वर्षाच्या सुकरामने 30 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न केले. सुकराम आधीपासूनच विवाहित असल्यामुळे दुसरे लग्न गुन्हा ठरतो. या प्रकरणी आपण लक्ष घालू असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थानच्या सामराडा गावात हा विवाह पार पाडला. या लग्नासाठी आसपासच्या 12 गावातून पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. एका गंभीर आजारपणामध्ये सुकराम बैरवाने 20 वर्षांपूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा गमावला. त्याच्याकडे भरपूर पैसा, जमीन जुमला आहे. त्याची काळजी घेण्यासाठी वारस हवा म्हणून सुकराने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीबरोबर लग्न केले.
सुकरामची पत्नी बॅट्टो त्याच्या या दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. सुकरामला पहिल्या पत्नीपासून दोन मुली असून त्या विवाहित आहेत. फक्त मुलासाठी आपण लग्न करत असल्याने सुकरामने सांगितले. जिल्हाधिकारी सुट्टीवर असल्यामुळे मी सध्या कोर्टात आहे. पण मी लवकरच सामराडा गावात जाऊन चौकशी करीन असे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी राजनारायण शर्मा यांनी सांगितले.