देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 22:57 IST2024-12-06T22:55:30+5:302024-12-06T22:57:56+5:30

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी 'पीएम श्री' योजना आणण्यात आली आहे. ही सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसाठी असेल. कारण त्यांना इतर शाळांसाठी एक मॉडेल बनवणे हा उद्देश आहे.

85 kendriya vidyalayas and 28 navodaya vidyalayas will open in the country delhi metro projects The decision was taken in the Union Cabinet meeting | देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय

देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि हरियाणा दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अंदाजे 26 किमी लांबीच्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याल्या अर्थाता रिठाला-नरेला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. याशिवाय, देशात 85 केंद्रीय विद्यालये आणि 28 नवीन नवोदय विद्यालये स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी 'पीएम श्री' योजना आणण्यात आली आहे. ही सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसाठी असेल. कारण त्यांना इतर शाळांसाठी एक मॉडेल बनवणे हा उद्देश आहे.

26 किमीच्या रिठाला-नरेला-नाथूपूर (कुंडली) कॉरिडोरला मंजुरी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली मॅट्रोच्या चौथ्या टप्प्याला अर्थात रिठाला-कुंडली कॉरिडोरला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दिल्ली-हरियाणा यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढेल. हा कॉरिडोर मंजूरीच्या तारखेपासून 4 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पासाठी एकूण 6230 कोटी रुपये लागणार आहेत.

85 नवे केंद्रीय विद्यालयं -
मंत्रिमंडळाने देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालयांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. 85 नव्या केव्हींची स्थापना आणि एका विद्यमान केव्हीच्या विस्तारासाठी अंदाजे 5872.08 कोटी रुपये आवश्यक असतील. याशिवाय, मंत्रिमंडळाने देशातील अस्पर्शित जिल्ह्यांमध्ये 28 नवीन नवोदय विद्यालये स्थापन करण्यासही मंजुरी दिली आहे.

Web Title: 85 kendriya vidyalayas and 28 navodaya vidyalayas will open in the country delhi metro projects The decision was taken in the Union Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.