निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:44 PM2023-05-01T13:44:12+5:302023-05-01T13:44:58+5:30

अधिकाऱ्यांनी जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित करून तिची पेन्शन बंद केली.

85 year old woman stops getting pension govt authorities declared dead in ajmer | निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले...

निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले...

googlenewsNext

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित करून तिची पेन्शन बंद केली. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे हे प्रकरण राजस्थानमधील अजमेरचे आहे. अजमेर जिल्ह्यातील एका गावात आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या 85 वर्षीय गट्टू देवी यांना जेव्हा कळलं की तिला मृत घोषित केल्यानंतर सरकारकडून मिळणारं पेन्शन बंद करण्यात आलं आहे, तेव्हा तिला धक्काच बसला. 

अजमेरच्या तोडगड तहसीलच्या बंजारी गावातील रहिवासी असलेल्या आजीला फेब्रुवारी 2022 मध्ये अखेरचे 1,500 रुपये पेन्शन मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम येणे बंद झाले. त्यांचा मुलगा चुन्नीलाल म्हणाला, "गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे पेन्शनचे पैसे येत आहेत, असे वाटल्याने आम्ही खाते तपासले नाही. मी पंचायत समितीत गेलो असता माझ्या आईला मृत घोषित करण्यात आले असून गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच पेन्शन बंद करण्यात आल्याचे आढळले."

सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून ही चूक कशी झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान, विभागाने गट्टू देवीची ओळख पडताळली असून उर्वरित पेन्शनचे पैसे पुढील महिन्यात दिले जातील, असे सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीने पडताळणी न करता गट्टू देवी यांना मृत घोषित केले.

मुलाने सांगितले की पंचायतीला मृत घोषित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि त्याशिवाय सिस्टम अपडेट करणे अशक्य आहे. मात्र, मृतांच्या यादीत माझ्या आईचे नावही नव्हते. बायोमेट्रिक ओळखीसाठी गट्टू देवी आपल्या मुलासोबत ई-मित्र केंद्रातही गेल्या होत्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते म्हणाले, "आम्ही तीन-चार वेळा केंद्रात गेलो, पण वृद्धत्वामुळे त्यांच्या बोटांचे ठसे घेता आले नाहीत." मात्र, ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते शांत झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 85 year old woman stops getting pension govt authorities declared dead in ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.