८६ टक्के नवे चलन वापरात येणार - अरुण जेटली
By admin | Published: November 9, 2016 05:39 PM2016-11-09T17:39:44+5:302016-11-09T17:56:16+5:30
५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे ८६ टक्के चलन बदलले जाणार आहे. कारण ८६ टक्के काळा पैसा..
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - ५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे ८६ टक्के चलन बदलले जाणार आहे. कारण ८६ टक्के काळा पैसा ५०० आणि १ हजारच्या नोटांच्या चलनामध्ये होता. हा पैसा दहशतवाद आणि भ्रष्टाचारासाठी वापरला जात होता असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अरुण जेटली यांच्या पत्रकारपरिषदेतील मुद्दे
- उद्यापासून ५०० आणि १ हजारच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफीसमध्ये उपलब्ध होतील. पुढच्या दोन ते तीन आठवडयात परिस्थिती सुरळीत होईल.
- या निर्णयामुळे निवडणुका स्वस्त झाल्या तर एका चांगली सुरुवात असेल.
- नव्या नोटांमध्ये कुठलीही चीप नाही .
- बँकेत नोटा बदलून देण्यासाठी गरजेनुसार अतिरिक्त व्यवस्था केली जाईल.
- आरबीआयकडून बँका आणि पोस्ट ऑफीसमध्ये पुरेस चलन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अजून दोन ते तीन आठवडयात चलन तुटवडा दूर होईल.
- आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय.
- डिपॉझिटस वाढल्यामुळे बँकांची क्षमताही वाढणार आहे, हा निर्णय लोकांच्या पैसा खर्च करण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतीवर परिणाम करणारा आहे.
- ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे समाजाने स्वागत केले, भारताची विश्वासहर्ता टिकून रहावी यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे, देशाला कॅशलेस अर्थव्यस्थेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे.
- आमचं सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले.