देशात 86.42 लाखांवर झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 03:19 AM2020-11-26T03:19:06+5:302020-11-26T03:19:38+5:30
९३.७२ टक्के प्रमाण; मृत्यूदर अवघा १.४७ टक्के
नवी दिल्ली : देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८६.४२ लाखांवर पोहोचली असून त्यांचे प्रमाण ९३.७२ टक्के आहे. एकूण रुग्णांची संख्या ९२ लाखांपेक्षा अधिक तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४७ टक्के व सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांहून कमी आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ४४,३७६ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ९२,२२,२१६ तर बरे झालेल्यांचा आकडा ८६,४२,७७१ आहे.
या आजाराने आणखी ४८१ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,३४,६९९ झाली आहे. सलग १५व्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांपेक्षा कमी म्हणजे ४,४४,७४६ आहे. अमेरिकेमध्ये १ कोटी २९ लाख कोरोना रुग्ण आहेत.
युरोपमधील नागरिकांनी दक्षता घ्यावी
कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आलेल्या युरोपला पुढच्या सहा महिन्यांत खडतर स्थितीचा सामना करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे संचालक हान्स क्लूग यांनी सांगितले. नागरिकांनी नीट दक्षता न घेतल्यास साथीचे संकट आणखी गडद होऊ शकते असेही ते म्हणाले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार देशात २४ नोव्हेंबरपर्यंत १३.४८ कोटी नमुन्यांची चाचणी कोरोनासाठी करण्यात आली होती. या चाचण्यांत मंगळवारी झालेल्या ११,५९,०३२ चाचण्यांचाही समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या माहितीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे रुग्णाच्या आरोग्यातील गुंतागुंत किंवा एकापेक्षा जास्त आजारांमुळे झाले आहेत.
६ कोटी १ लाखांवर जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या
४ कोटी १५ लाख रुग्ण कोरानामुक्त झाले
१४ लाख १५ हजार लोकांचा कोरानामुळे बळी गेला
१ कोटी २९ लाख कोरोनारुग्ण अमेरिकेत आहे.