८ वी पास विक्रमच्या बँक खात्यात जमा झाले २०० कोटी, पोलीस आले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 04:11 PM2023-09-06T16:11:12+5:302023-09-06T16:12:38+5:30
बेरला येथील विक्रम ८ वी पास असून दोन महिन्यांपूर्वीत तो कामासाठी पटौदी येथे गेला आहे.
हरयाणाच्या चरखी दादरी येथील बेरलाचा रहिवाशी असलेला कामगार विक्रमच्या खात्यात तब्बल २०० कोटी रुपये जमा झाले आहेत. यश बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली असून ह्या रक्कमेला होल्डवर ठेवण्यात आलं आहे. विक्रमचा भाऊ प्रदीप आणि आई बिना देवी यांनी यासंदर्भात माहिती दिली. विक्रमच्या खात्यात ही रक्कम कुठून आली, कोणी टाकली याची कुणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे ज्या बँक खात्यातून ही रक्कमेचं ट्रान्झेक्शन झालंय ते प्रत्येक ट्रान्झेक्शनच्या रकमचे सगळेच अंक ९ आहेत, यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेरला येथील विक्रम ८ वी पास असून दोन महिन्यांपूर्वीत तो कामासाठी पटौदी येथे गेला आहे. एक्सप्रेस २० नावाच्या कंपनीत त्याने कामगार म्हणून कामालाही सुरुवात केली. बँकेत खातं उघडण्यासाठी विक्रमकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मात्र, बँकेकडून खातं रद्द झाल्यानंतर विक्रमला नोकरीतून काढून टाकण्यात आलं. या कंपनीत त्याने १७ दिवस काम केले, अशी माहिती त्याचा भाऊ प्रदीने दिली आहे.
प्रदीपने दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी दोन सप्टेंबर रोजी युपी पोलीस विक्रमच्या घरी आली होती. तीन सदस्यीत पथकानेच कुटुंबीयांना ही, विक्रमच्या बँक खात्यात २०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती दिली. पोलिसांकडून प्रदीपला पोलीस ठाण्यात नेण्यात येणार होते. मात्र, नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी घरीच चौकशी करुन ते निघून गेले.
दरम्यान, प्रदीपने बँकेत धाव घेतली असता गुजरात पोलिसांकडून ही रक्कम होल्ड करण्यात आल्याची माहिती बँकेने त्यांस दिली. याप्रकरणी, आपण मुख्यमंत्री, पंतप्रधान, योगी आदित्यनाथ, डीजीपी यांनाही ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच, याप्रकरणी जिल्हा पोलिसांकडे तक्रार दिल्याचे प्रदीपने म्हटले. मात्र, दादरी पोलिसांनी यासंबंधित तक्रारी आल्याचे स्पष्ट शब्दात नाकारले आहे. त्यामुळे, विक्रमच्या खात्यात जमा झालेल्या २०० कोटींचं गौडबंगाल अद्यापही कायम आहे.