राजकीय पक्षांना मिळाल्या ९५६.७७ कोटींच्या देणग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:38 AM2017-08-18T05:38:35+5:302017-08-18T05:38:37+5:30

राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांना कंपन्यांनी २०१२-२०१३ आणि २०१५-२०१६ या चार वर्षांत ९५६.७७ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या.

9 56.77 crore donations received by political parties | राजकीय पक्षांना मिळाल्या ९५६.७७ कोटींच्या देणग्या

राजकीय पक्षांना मिळाल्या ९५६.७७ कोटींच्या देणग्या

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांना कंपन्यांनी २०१२-२०१३ आणि २०१५-२०१६ या चार वर्षांत ९५६.७७ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. ज्ञात स्रोतांकडून दिल्या गेलेल्या एकूण देणग्यांपैकी ८९ टक्के भाग हा भाजपला (७०५.८१ कोटी रुपये) मिळाला. राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपला २,९८७ कंपन्यांकडून सर्वात जास्त म्हणजे ७०५.८१ कोटी रुपयांची देणगी मिळाली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १६७ कंपन्यांकडून १९८.१६ कोटी रुपये मिळाले, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) गुरुवारी येथे सांगितले. निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांनी जी माहिती सादर केली त्याचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५०.७३ कोटी, मार्क्सवादी पक्षाला १.८९ कोटी आणि ०.१८ कोटी रुपये भाकपला मिळाले. या अहवालात बहुजन समाज पक्षाचा विश्लेषणासाठी विचार करण्यात आलेला नाही.
२०१२-२०१३ आणि २०१५-२०१६ वर्षांत पाच राष्ट्रीय पक्षांनी २० हजार रुपयांच्या वर स्वेच्छेने देणगीच्या माध्यमातून १,०७०.६८ कोटी रुपये मिळवले. यातील ८९ टक्के देणगी (९५६.७७ कोटी रुपये) कंपन्या/उद्योजकांकडून मिळाली, असे एडीआरने म्हटले.
एडीआरने यापूर्वी दिलेल्या अहवालानुसार वेगवेगळ्या व्यावसायिकांनी ३७८.८९ कोटी रुपयांची देणगी राष्ट्रीय पक्षांना दिली. त्यातील ८७ टक्के देणगी ही आर्थिक वर्ष २००४-२००५ आणि २०११-२०१२ मध्ये ज्ञात स्रोतांकडून मिळालेली होती.
२० हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाºया देणगीदारांची माहिती निवडणूक आयोगाला देणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. या अहवालात म्हटले आहे की, २०१२-१३ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट/व्यावसायिक घराण्यांकडून भाजप आणि काँग्रेसला देण्यात आलेल्या २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांचे प्रमाण अनुक्रमे ९२ टक्के आणि ८५ टक्के आहे. माकपा आणि भाकपाला मिळालेल्या देणग्यांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ४ टक्के आणि १७ टक्के आहे. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुका झालेल्या वर्षात म्हणजे २०१४-१५ मध्ये मोठ्या प्रमाणात देणग्या स्वीकारल्या.
सत्य इलेक्ट्रॉल ट्रस्टने २०१२-१३ आणि २०१५-१६ या काळात ३५ वेळा देणग्या दिल्या आहेत. त्यांनी एकूण २६०.८७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यात भाजपने १९३.६२ कोटी, तर काँग्रेसने ५७.२५ कोटी रुपये देगणी स्वीकारली होती.
दरम्यान, २०१२-१३ या काळात रिअल इस्टेट क्षेत्राने १६.९५ कोटी रुपयांच्या देणग्या राष्ट्रीय पक्षांना दिल्या. भाजपने १४ प्रमुख क्षेत्रांकडून देणग्या स्वीकारल्या. यात रिअल इस्टेट (१०५.२० कोटी), बांधकाम क्षेत्र, निर्यात, आयात (८३.५६ कोेटी), केमिकल्स, फार्मास्युटिकल्सकडून (३१.९४ कोटी) रुपये स्वीकारले. एकूण १,९३३ देणग्यांमधून राष्ट्रीय पक्षांनी ३८४.०४ कोटी रुपये स्वीकारले. पॅन व पत्ता आदी माहिती नसलेल्या १५९.५९ कोटी रुपयांच्या देणग्यांतील ९९ टक्के देणग्या भाजपशी संबंधित आहेत.

Web Title: 9 56.77 crore donations received by political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.