९८ कोटी जमा करणाऱ्यास अटक
By admin | Published: December 30, 2016 01:32 AM2016-12-30T01:32:38+5:302016-12-30T01:32:38+5:30
बनावट दस्तावेज तयार करून तब्बल ९८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरणाऱ्या एका व्यावसायिकास हैदराबादेत अटक करण्यात आली. त्याच्या काही नातलगांवरही गुन्हे नोंदविण्यात
हैदराबाद : बनावट दस्तावेज तयार करून तब्बल ९८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरणाऱ्या एका व्यावसायिकास हैदराबादेत अटक करण्यात आली. त्याच्या काही नातलगांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी एकाला अटकही करण्यात आली आहे.
कैलाश चंद गुप्ता (६५) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल क्राइम स्टेशन विभागाने त्याला अटक केली. फसवणूक करणे, बनावट दस्तावेज तयार करणे आणि नोटाबंदीत बेकायदेशीर लाभ मिळविणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
गुप्ता याचा मेहुणा आणि एका खासगी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक नरेदी नरेंदर कुमार (५९) यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहकार्य करणे आणि कैलाश चंद गुप्ता याला आश्रय देणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.
आणखी ४0 कोटी रुपये वैष्णवी बुलियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अॅडव्हान्सपोटी मिळाल्याचे दाखविण्यात आले. त्यासाठी २१ ग्राहकांच्या नावे बनावट पावत्या तयार करण्यात आल्या.
हा सर्व व्यवहार ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १२ या वेळेत झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. हा सर्व पैसा एसबीआय आणि अॅक्सिस बँकेत जमा करण्यात आला होता. अनेक ग्राहक परराज्यातील दाखविण्यात आले. ग्राहकांच्या यादीतील एका महिलेची चौकशी केली असता ८ नोव्हेंबर रोजी तसेच त्यानंतर संबंधित दुकानातून आपण कोणतीही खरेदी केलेली नसल्याचे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)
- गुप्ता याच्या सोन्या-चांदीच्या तीन कंपन्या आहेत. त्याची दोन मुले, एक सून आणि अन्य एक महिला त्यावर संचालक आहेत.
- मुले नितीन आणि निखिल, सून स्नेहा आणि इतरांसोबत कट आखून त्याने काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.-
- 3100 लोकांकडून अॅडव्हान्सच्या रुपाने ५७.८५ कोटी आपल्या मुसाद्दिलाल जेम्स अँड ज्वेलर्स प्रा. लि. या कंपनीला मिळाल्याचे दाखविले.