०९... गुन्हे... वायर

By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:08+5:302015-02-10T00:56:08+5:30

(फोटो)

9 ... criminals ... wire | ०९... गुन्हे... वायर

०९... गुन्हे... वायर

Next
(फ
ोटो)
इलेक्ट्रिक वायरचोर टोळीचा पर्दाफाश
पाच चोरट्यांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑरेंज सिटी पार्कच्या गोदामातून इलेक्ट्रिक वायरच्या बंडलांसह इतर साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. यात पाच चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
योगेश दामोदर बावणे (२७), मुरलीधर गोपिचंद वाघधरे (२२६), शुभम दिलीप मिश्रा (२५), विकास मूलचंद मेश्राम (२१) व सचिन देवानंद कुंभरे (२२) सर्व रा. जुनी कामठी, अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑरेंज सिटी येथे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तिथे गोदाम तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात ईलेक्ट्रिक फिटिंगचे साहित्य ठेवण्यात आले होते.
दरम्यान, ऑक्टोबर २०१४ मध्ये या पाचही चोरट्यांनी संगनमत करून या गोदामातील इलेक्ट्रिक वायरचे ९४ बंडल, स्विचचे २१ बॉक्स, एक ड्रील मशीन, दोन कटर एवढा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून कामठी पोलिसांनी तपास सुरू केला होता.
सदर घटना घडल्यानंतर कामठी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते. त्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने या पाचही आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतले. सर्वांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्या पाचही चोरट्यांना अटक करून त्यांना कामठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी गोदामातून चोरून नेलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक अमित काळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, कामठीचे ठाणेदार सतीश गोवेकर, प्रमोद बन्सोड, मुद्दसर जमाल, सुरेश गाते, राधेश्याम कांबळे, वसंता चुटे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)
***

Web Title: 9 ... criminals ... wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.