राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:30 AM2020-02-11T08:30:16+5:302020-02-11T08:34:16+5:30

राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

9 dead after a bus and a Bolero collided with each other in Bigod area of Bhilwara district | राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी

राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Next
ठळक मुद्देराजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या भीषण अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील बिगोडजवळ सोमवारी रात्री बस आणि बोलेरोचा अपघात झाला. 

बस कोटा जिल्ह्यातून भीलवाडा बस डेपोच्या दिशेने जात होती. तर बोलेरोमध्ये असलेली मंडळी एका विवाह सोहळ्यावरून घरी परतत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना भीलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या भीषण अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच जखमींना योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे. मृतांमध्ये 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. 15 जण जखमी झाले असून ते खंधारा गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: आप सुस्साट; सुरुवातीच्या कलांमध्ये ३२ जागांवर आघाडी

IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी

‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

मुख्यमंत्री ठाकरे यांनाही मिळाला होता शिक्षकांचा ‘प्रसाद’

 

Web Title: 9 dead after a bus and a Bolero collided with each other in Bigod area of Bhilwara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.