बस, जीपची धडक; ९ ठार, ३० जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 07:14 AM2020-10-18T07:14:41+5:302020-10-18T07:15:13+5:30

पिलिभीत : उत्तर प्रदेश रोडवेजची एक बस आणि जीप यांची समोरासमोर धडक होऊन उत्तर प्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्यात झालेल्या अपघातात ...

9 killed and 30 injured in Bus jeep Accident | बस, जीपची धडक; ९ ठार, ३० जखमी

बस, जीपची धडक; ९ ठार, ३० जखमी

Next

पिलिभीत :उत्तर प्रदेश रोडवेजची एक बस आणि जीप यांची समोरासमोर धडक होऊन उत्तर प्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्यात झालेल्या अपघातात ९ जण ठार आणि ३० जण जखमी झाले. पुरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.

शनिवारी सकाळी ही घटना घडली. मृत्यू पावलेल्यांत बस आणि जीप अशा दोन्ही वाहनांतील प्रवाशांचा समावेश आहे. सात जण जागेवरच ठार झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बस लखनौहून पिलिभीतला येत होती. अपघात स्थळ जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. जीपसोबत धडक झाल्यानंतर बस जवळच्या दरीत कोसळली. मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. शकील (२८) असे मृत चालकाचे नाव आहे. इतर मृतांमध्ये गयादीन (४५), कलावती (४०), मोहन बहादूर (४५), दीपा विश्वास (५०) आणि श्याम (१२) यांचा समावेश आहे.

Web Title: 9 killed and 30 injured in Bus jeep Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.