जलयुक्त लातूरसाठी मुस्लिम समाजाकडून ९ लाखाचा निधी
By admin | Published: May 21, 2016 11:48 PM2016-05-21T23:48:13+5:302016-05-22T00:05:33+5:30
लातूर: मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत असून आता मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक निधी म्हणून ९ लाख रुपयाचा धनादेश जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
लातूर: मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत असून आता मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक निधी म्हणून ९ लाख रुपयाचा धनादेश जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
जलयुक्त लातूर-सर्वांसाठी पाणी ही संकल्पना घेवून उभ्या राहिलेल्या जलयुक्त चळवळीस समाजातील सर्व घटकांचे योगदान लाभत आहे. त्यासाठी शहरातील मरकज मुस्जिदीमध्ये नमाज अदा करतांना मौलांनानी सर्व मुस्लिमांनी जलयुक्त कामासाठी घडेल ती मदत करावी असे आवाहन केले. त्याची सुरुवात म्हणून प्रारंभीक निधीचे योगदान देण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी गंजगोलाईतील अंजुमन-ए-इस्लामिया मदरसा, मिस्बाहुल उलूम येथे या मदरशाचे अध्यक्ष मौलाना अ. गफूरसाब यांच्या अध्यक्षतेखाली हा निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते जलयुक्त लातूर मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी ॲड़ त्र्यंबकदास झंवर, ॲड. मनोहरराव गोमारे, निलेश ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मौलाना मोहिबोद्दीन अली मौलाना, उद्योजक सय्यद सल्लाउद्दीन, फय्याज पटेल, जमील नाना, आरिफ पटेल, मुफ्ती ओवेस, सय्यद कलीम, मौलाना सोहेल, पाशामियॉं बिरादार, फारुख भाई, कलीम शेख, शेरखॉं पठाण, मोईज शेख, आयुब तांबोळी आदींही उपस्थित होते.
या वेळी व्हीकेसी फुटवेअर्स, केरळ या कंपनीच्या वतीने फैय्याज पटेल यांनी लातूर फुटवेअर असोसिएशनचा ५ लाख रुपयाचा धनोदश डॉ. कुकडे यांच्याकडे सुपूर्द केला. गंजगोलाई टपरी असोसिएशनच्या वतीने ११ हजाराचा निधी देण्यात आला.
व्हीकेसी प्राईड फुटवेअर कंपनीचे अध्यक्ष व्हीकेसी मोहम्मद कोया हे नवनिर्वाचित आमदार असून त्यांच्या प्रयत्नातून हा निधी जमा करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निधीत उद्योजक सय्यद सल्लाउद्दीन यांनी अडीच लाख, ॲड. जहीरोद्दीन सय्यद व समद काझी यांनी प्रत्येक ५ हजार, सय्यद कलीम यांनी २१०० रुपये व कलीम खोरीवाले यांनी १ हजार रुपये वैयक्तिकरीत्या दिले.
अंजुमन-ए-इस्लामिया मदरसाच्या वतीने मौलाना अ.गफुरसाब हे १ लाखाचा धनादेश डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे सुपूर्द करतांना. बाजूस जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, ॲड़ मनोहरराव गोमारे, ॲड. त्र्यंबकदास झंवर, आयुब तांबोळी आदी.
उद्योजक सय्यद सल्लाऊद्दीन हे अडीच लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्याकडे देतांना. बाजुस मोईज शेख, ॲड. मनोहरराव गोमारे आदी.
सिंधी सेवा मंडळाचा १ लाखाचा निधी
सिंधी सेवा मंडळाच्या वतीने जलयुक्त लातूरच्या कामासाठी १ लाख ११ हजाराचा निधी देण्यात आला. नानिक जोधवानी, दीपक चेटवाणी, मुकेश रामचंदानी, कमलकुमार जोधवानी, घनश्याम कामदार, मनोहर वार्याणी, अशोक वार्याणी, राजू मेहता, किशोर कटारिया जलयुक्तच्या कार्यालयात येऊन यांनी जलयुक्तचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी ॲड. त्र्यंबकदास झंवर, निलेश ठक्क
विवेकानंद रुग्णालयाकडून जलयुक्त लातूरसाठी १ लाख ५१ हजाराचा निधी
विवेकानंद मेडीकल फाऊंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर या प्रतिष्ठानचे कार्यवाह अनिल अंधोरीकर यांनी आज जलयुक्त कार्यालयात येऊन निलेश ठक्कर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विवेकानंद रुग्णालयातील डॉ. चंद्रशेखर औरंगाबादकर, सोमनाथ बालवाड, अनिल जवळेकर, दिगंबर माळवदे, गोविंद सावंत, सहदेव गावकरे, राजा ठाकूर, भागवत चव्हाण उपस्थित होते.