पश्चिम बंगालमध्ये 24 तासांत 10 मुलांचा मृत्यू; रुग्णालयात खळबळ, डॉक्टरांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:56 PM2023-12-08T15:56:41+5:302023-12-08T15:57:24+5:30
गेल्या 24 तासांत 9 नवजात बाळांचा आणि 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेल्या 24 तासांत 9 नवजात बाळांचा आणि 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा अशी घटना घडली असून त्यात एकाच दिवसात इतक्या मुलांचा मृत्यू झाला आहे.
लहान मुलांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाला आहे. कुपोषण, श्वसनाचा त्रास आदींमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य अमित दाऊ म्हणाले की, यावेळी वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचा मृत्यू झाला आहे.
तीन मुलांचा मृत्यू मार्टिमामुळे झाला तर एकाचा मृत्यू रेस्पिरेटरी लो डिस्ट्रेस सिंड्रोममुळे झाला. अत्यंत कमी वजनामुळे एकाचा मृत्यू झाला. जन्मानंतर मुलाचे वजन फक्त 400 ग्रॅम होतं
मृतांपैकी तीन अर्भकांचा जन्म मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झाला होता. उर्वरित दहा जणांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून रेफर करण्यात आले. डोमकल आणि लालबाग उपविभागीय रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांना वाचवणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितले. यातील एका मुलाचा मृत्यू झाला होता.
रुग्णालयात सातत्याने होणाऱ्या मृत्यूंच्या चौकशीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. हे पथक शुक्रवारी आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र, प्राथमिक सुविधांअभावी पहिले दहा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.