मणिपूरमध्ये दरडी कोसळून ९ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:20 AM2018-07-12T05:20:03+5:302018-07-12T05:20:21+5:30

णिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.

9 people killed in a Manipur | मणिपूरमध्ये दरडी कोसळून ९ जण ठार

मणिपूरमध्ये दरडी कोसळून ९ जण ठार

Next

इंफाळ - मणिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.
तामेंगलाँग हा आसाममधील नॉर्थ कचर हिल व नागालँडच्या पेरेन जिल्ह्याला लागून आहे. मंगळवारी रात्रीपासून तीन ते चार तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, दरडींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावलेली आठ मुले ही अठरा वर्षे वयाखालील आहेत.
त्यापैकी एका मुलाची आईदेखील या दुर्घटनेत बळी पडली आहे. तामेंगलाँग जिल्ह्यातील न्यू सालेम, नेइगलाँग, रामगईलाँग या तीन ठिकाणी जेव्हा दरडी कोसळल्या तेव्हा त्या परिसरातील लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे कोणालाही स्वत:च्या बचावासाठी दुर्दैवाने काहीही प्रयत्नही करता येणे शक्य झाले नाही. न्यू सालेम येथे दरडीखाली दबून ठार झालेल्या पाच जणांमध्ये कैथुआंग रिमेई (४४) यांच्या दोन मुली व तीन मुलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

तीन वर्षांपूर्वी घडली होती अशीच दुर्घटना

म्यानमारच्या सीमेलगत असलेल्या मणिपूरमधील चंडेल जिल्ह्यातील जौमोल गावामध्ये आॅगस्ट २०१५मध्ये दरडी कोसळून २० जण ठार झाले होते. त्यानंतर अशा प्रकारची राज्यातील सर्वात भीषण घटना बुधवारी पहाटे घडली आहे.

Web Title: 9 people killed in a Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.