90 टक्के भारतीय, तर 95 टक्के पाकिस्तानी मूर्ख आहेत- काटजू
By admin | Published: January 9, 2017 06:36 PM2017-01-09T18:36:36+5:302017-01-09T18:36:36+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी कायमच चर्चेत असतात.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांना टीकेचे लक्ष्य केलं आहे. काटजूंनी 90 टक्के भारतीय, 95 टक्के पाकिस्तानी मूर्ख असल्याचं त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्ताननं स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केल्यानं पाकिस्तानला 5 टक्के जास्त दिल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच भारतानं स्वतःला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून घोषित केलं आहे. स्काइपवर चर्चेदरम्यान मित्राला असं सांगितल्याचं काटजू ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत. जर पाकिस्तानने शारिया आणि बुरखा पद्धत रद्द केली पाहिजे असं वाटत असेल तर धार्मिक कट्टरपंथीयांनाही समाप्त करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. माझा बीफचं मटण खाण्यासही विरोध नाही. तसेच गाय आपली माता असल्याचं म्हणणं मूर्खपणाचं आहे, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानला जास्त प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं पाहिजे.
(उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होईल - मार्कंडेय काटजू)
(BCCI पदाधिकाऱ्यांना नग्नावस्थेत खांबाला बांधून शंभर फटके द्या- मार्कंडेय काटजू)
पाकिस्तानात धार्मिक रूढी आणि परंपरांना विरोध करणारे मानवी हक्क कार्यकर्ते एकतर गायब झाले आहेत किंवा त्यांचा खून करण्यात आला आहे. भारतातही अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर आणि बेधडक लिहिणा-या 100हून अधिक पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे.