कुंभारीत ९० टक्के महिला, मुलींचे हिमोग्लोबीन कमी संजीवनी बी़ फार्मसीच्या शिबिरातून पुढे आला प्रकार
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:56+5:302014-12-20T22:27:56+5:30
कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथे १०३० महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली़ वैद्यकीय शास्त्रानुसार महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२ ते १४ ग्रॅम/डेली आवश्यक असते़ परंतु ९० टक्के महिलांमध्ये हे प्रमाण दहा गॅ्रम/ डेली पेक्षाही कमी असल्याचे आढळून आले़ हा प्रकार संजीवनी बी़ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून पुढे आला़
Next
क परगाव : तालुक्यातील कुंभारी येथे १०३० महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली़ वैद्यकीय शास्त्रानुसार महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२ ते १४ ग्रॅम/डेली आवश्यक असते़ परंतु ९० टक्के महिलांमध्ये हे प्रमाण दहा गॅ्रम/ डेली पेक्षाही कमी असल्याचे आढळून आले़ हा प्रकार संजीवनी बी़ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून पुढे आला़संजीवनी बी़ फार्मसी महाविद्यालय आयोजित कुंभारी येथे राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत हिवाळी शिबिराची सांगता संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तहसीलदार इंदिरा चौधरी, प्राचार्य संजय आरोटे उपस्थित होते़ कार्यक्रम अधिकारी प्रा़ रावसाहेब शेंडगे यांनी सप्ताह काळात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली़ व्यसनमुक्ती, स्त्री भू्रणहत्या, महिला सबलीकरण आदी विषयांवर गावकर्यांचे प्रबोधन केले़ या शिवाय १२०० पुरूष व महिलांचे रक्तगट तपासून देण्यात आले़ एक हजार ३० महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण तपासण्यात आले़ यात ९० टक्के महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. बी़ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी हिमोग्लोबीन कमी असणार्या मुली व महिलांना आहाराविषयी घ्यावयाची काळजी व मार्गदर्शन केले़ शिबीराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती सुनील देवकर यांच्या हस्ते झाले़ यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय नायडू, ग्रामविकास अधिकारी आऱ आय़ पटेल, सरपंच मथुरार्बा कबाडी, उपसरपंच शिवाजीराव घुले, भाऊसाहेब गोडगे उपस्थित होते़