४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:50 PM2023-06-07T13:50:41+5:302023-06-07T13:51:12+5:30
दूध भेसळीच्या ४० वर्ष जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला एका ९० वर्षीय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
४२ वर्षापूर्वी दुधात भेसळ केल्याप्रकरणी एका ९० वर्षाच्या व्यक्तीला उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आता त्या व्यक्तीने सर्वाच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयाने २९ वर्षांनंतर शिक्षा सुनावली. कोर्टाचे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
कोल्हापूरच्या घटनेवरून शरद पवारांचा गंभीर आरोप; "सत्ताधारी पक्ष या घटनांना...
उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर १० वर्षांनंतर या व्यक्तीला गेल्या महिन्यात कनिष्ठ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंटवर अटक करण्यात आली होती. आता तो व्यक्ती ९० वर्षांचा आहे. या शिक्षेला आव्हान देत त्यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एका दिवसानंतर, सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ त्यावर सुनावणी करेल.
वीरेंद्र कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. ४० वर्षापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानेही त्यांना शिक्षा सुनावली होती. गेल्या महिन्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. कुमार यांनी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केली असून अपीलावर निर्णय होईपर्यंत जामीन मागितला आहे. मंगळवारी, त्यांचे वकील अजेश कुमार चावला यांच्या विनंतीवरून, न्यायमूर्ती अनिर्द्ध बोस आणि राजेश बिंदल यांच्या सुट्टीतील खंडपीठाने गुरुवारी याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले.
७ ऑक्टोबर १९८१ रोजी वीरेंद्र कुमार यांना अन्न निरीक्षकांनी दुधात भेसळ केल्याप्रकरणी पकडले. तेव्हा ते ४८ वर्षांचे होते. ते दूध विक्रेता म्हणून काम करत नाही तर बस कंडक्टर होते असा त्यांनी दावा केला आहे. २९ सप्टेंबर १९८४ रोजी खुर्जाच्या न्यायदंडाधिकार्यांनी त्यांना अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवले. त्याविरुद्ध त्यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली. १४ जुलै १९८७ रोजी बुलंदशहर सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर हे प्रकरण २६ वर्षे अलाहाबाद उच्च न्यायालयात चालले. ३० जानेवारी २०१३ रोजी हायकोर्टानेही वीरेंद्र कुमारला दोषी ठरवले होते.
अन्न निरीक्षक वीरेंद्र कुमार यांच्याकडून घेतलेल्या दुधाच्या नमुन्यात भेसळ आढळून आली. ट्रायल कोर्टात आपल्या बचावात कुमार यांनी युक्तिवाद केला की ते बस कंडक्टर होते आणि दूध विक्रीच्या व्यवसायात नव्हते. ७ ऑक्टोबर १९८१ रोजी ते धार्मिक कार्यासाठी मिळालेले दूध घेऊन जात होते, असाही त्यांनी दावा केला आहे.
पुरावे तपासल्यानंतर ट्रायल कोर्ट या निष्कर्षाप्रत आले की, किरयावली गाव ते कल्याणपूर गाव हे १९ किलोमीटरचे अंतर आहे. एखादी व्यक्ती केवळ धार्मिक विधीसाठी दूध देण्यासाठी ३८ किलोमीटरचा प्रवास करेल यावर विश्वास ठेवता येत नाही.