२९ हजार हेक्टरवर जलयुक्त शिवारची कामे ९६ कोटींचा खर्च : कृषी व वनविभागाची आघाडी ; ५०८ कामे प्रगतीपथावर
By admin | Published: June 12, 2016 10:35 PM2016-06-12T22:35:36+5:302016-06-12T22:35:36+5:30
जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला मार्च महिन्यानंतर आलेल्या वेगामुळे जिल्हाभरात विविध विभागामार्फत २९ हजार ५४६ हेक्टर वरील कामे पूर्ण झाली आहेत. कृषी व वनविभागांनी कामांमध्ये आघाडी घेतली असून या योजनेवर आतापर्यंत ९६ कोटी ६३ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
Next
ज गाव : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला मार्च महिन्यानंतर आलेल्या वेगामुळे जिल्हाभरात विविध विभागामार्फत २९ हजार ५४६ हेक्टर वरील कामे पूर्ण झाली आहेत. कृषी व वनविभागांनी कामांमध्ये आघाडी घेतली असून या योजनेवर आतापर्यंत ९६ कोटी ६३ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.कंपार्टमेंट बंडींगची ३८३ कामेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभरात ३० हजार २०५ हेक्टरवरील ५ हजार २०७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २५ हजार ९ हेक्टरवरील ३ हजार ९३२ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात कंपार्टमेंट बंडींगचे ३८३, शेततळ्याचे ८७, मातीनाला बांधचे १०, सिमेंट नाला बांध दुरुस्तीचे ६१, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर (ठिबक) दोन हजार ३५५, नालाखोलीकरणाचे ९२८, सीसीटीचे ५ तर नवीन सीएनबीचे १०२ कामे पूर्ण झाली आहेत.लघुसिंचन व जलसंधारण विभागाची धिमिगतीजिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या ३३२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यापैकी केवळ १६८ कामे पूर्ण झाली आहे. त्यात ५१ नवीन साठवण बंधारे,५२ साठवण बंधार्यांची दुरुस्ती, २७ पाझर तलाव दुरुस्तीचे, ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती, गाळ काढण्याचे ४ कामे, नवीन सीएनबीची २३ कामे झाली आहेत. ३२३ कामांपैकी अजून १५८ कामे अपूर्ण आहेत. येत्या २० दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागासमोर आहे. जलसंधारण विभागाच्या १३० कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र या विभागाकडून आतापर्यंत ९१ कामे पूर्ण झाले आहेत. १४ कामे जून महिन्यापर्यंत पुर्ण करायचे आहे.विहिर पुनर्भरणचे कामे वेगातजिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे पाझर तलावातील गाळ काढणे व विहिर तसेच बोअरवेलच्या पुर्नभरणाच्या १३४४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या विभागाने आतापर्यंत तब्बल १३४२ कामे पूर्ण केली आहेत. शिल्लक राहिलेली दोन कामे काही दिवसात पूर्ण होणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाची ३४८ कामे पूर्ण झाली आहेत. १४७ कामे प्रगतीपथावर आहेत. यात हायड्रो फ्रॅक्टरींगचे १००, रिचार्ज शाफ्ट ॲण्ड रिचार्ज ट्रेंजची २०४, ॲक्विफर रिचार्ज शाफ्टची ४४ कामे पूर्ण झाली आहेत. रिचार्ज शाफ्टची १४७ कामे या विभागामार्फत सुरु आहेत.