पतसंस्थेतील गैरकारभारामुळे ९०७ जणांची तुरुंगवारी लेखापरीक्षणानंतर कारवाई : ५२५ संचालक, ६६ व्यवस्थापक, ३१३ कर्जदारांचा समावेश

By admin | Published: November 19, 2015 09:57 PM2015-11-19T21:57:18+5:302015-11-19T21:57:18+5:30

जळगाव : सहकार कायद्यांचे उल्लंघन, बेनामी व्यवहार, असुरक्षित कर्जवाटप यासार्‍याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्‘ातील सहकार क्षेत्र कोलमडले. गैरव्यवहारात गुंतलेल्या जिल्‘ातील ४३ नागरी सहकारी पतसंस्थांमधील ९०७ जणांविरुद्ध विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गैरव्यवहारात सहभागी असलेल्या ४९८ जणांविरुद्ध २८८.९७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

907 prisoners due to irregularities in the credit society, after taking audit: 525 directors, 66 managers, 313 borrowers included | पतसंस्थेतील गैरकारभारामुळे ९०७ जणांची तुरुंगवारी लेखापरीक्षणानंतर कारवाई : ५२५ संचालक, ६६ व्यवस्थापक, ३१३ कर्जदारांचा समावेश

पतसंस्थेतील गैरकारभारामुळे ९०७ जणांची तुरुंगवारी लेखापरीक्षणानंतर कारवाई : ५२५ संचालक, ६६ व्यवस्थापक, ३१३ कर्जदारांचा समावेश

Next
गाव : सहकार कायद्यांचे उल्लंघन, बेनामी व्यवहार, असुरक्षित कर्जवाटप यासार्‍याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्‘ातील सहकार क्षेत्र कोलमडले. गैरव्यवहारात गुंतलेल्या जिल्‘ातील ४३ नागरी सहकारी पतसंस्थांमधील ९०७ जणांविरुद्ध विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गैरव्यवहारात सहभागी असलेल्या ४९८ जणांविरुद्ध २८८.९७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
२००७ पूर्वी सर्वाधिक गैरव्यवहार
जिल्‘ातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवस्थापनामुळे नागरी व ग्रामीण पतसंस्थांमधील ठेवीदारांची आपल्या हक्काच्या रकमेसाठी ओरड सुरू झाली. सहकार विभागाने आर्थिक अडचणीतील पतसंस्थांच्या लेखापरीक्षणाचे आदेश दिले. त्यात चाचणी लेखा परीक्षणात १५ पतसंस्थांमधील १७० संचालक, १४ व्यवस्थापक, ४२ कर्जदार अशा २२७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. वैधानिक लेखा परीक्षणानंतर १० पतसंस्थांमधील ९९ संचालक २१ व्यवस्थापक, १२९ कर्जदार, दोन लेखा परीक्षक व एक प्रशासक अशा २५२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. रेकॉर्ड उपलब्ध न करून देणार्‍या सहा पतसंस्थांमधील ६४ संचालक व सात व्यवस्थापक अशा ७१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर संस्थेच्या प्रशासकांनी दोन पतसंस्थेतील २९ संचालक, सहा व्यवस्थापक व ५१ कर्जदार अशा ८६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
नव्याने १५ पतसंस्थांवर कारवाई
सहकार विभागातर्फे व्यापक स्वरुपात कारवाई करण्यात आल्यानंतर पतसंस्थांमधील गैरव्यवहाराला काही प्रमाणात प्रतिबंध बसला. मात्र २००७ नंतर नव्याने अडचणीत असलेल्या १५ पतसंस्थाचालकांविरुद्ध कारवाईचा फास आवळण्यात आला. वैधानिक लेखापरीक्षणानंतर ९ पतसंस्थेतील १०९ संचालक, ११ व्यवस्थापक व ८४ कर्जदार अशा २०४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या संशयितांनी सात कोटी ९४ लाख ७८ हजारांचा गैरव्यवहार केला आहे. तर अडचणीत आलेल्या व्यतिरिक्त अन्य नागरी सहकारी पतसंस्था असलेल्या सहा संस्थेतील ५४ संचालक, सहा व्यवस्थापक व सात कर्जदार अशा ६७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या संचालकांनी सात कोटी ४८ लाख ७१ हजार इतक्या रकमेचा गैरव्यवहार केला आहे.

Web Title: 907 prisoners due to irregularities in the credit society, after taking audit: 525 directors, 66 managers, 313 borrowers included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.