केंद्राने एका महिन्यात केले 93000 तक्रारींचे निवारण
By admin | Published: September 15, 2016 05:05 PM2016-09-15T17:05:57+5:302016-09-15T17:05:57+5:30
विविध सरकारी खात्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींपैकी तब्बल 93 हजार तक्रांरीचे निवारण करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - विविध सरकारी खात्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींपैकी तब्बल 93 हजार तक्रांरीचे निवारण करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये 1 लाख 903 तक्रारी सरकारी विभागांविरोधात करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 93,379 किंवा तब्बल 93 टक्के तक्रारी सोडवण्यात आल्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
तक्रारी किंवा कुठलंही काम प्रलंबित राहू नये यावर केंद्र सरकारचा कटाक्ष असल्याचे सिंह म्हणाले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी लवकरात लवकर निकाली काढण्यावर भर देण्यात आल्याचे आणि विक्रमी तक्रार निवारण केल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांमध्ये सरकारी विभागांवरोधात करण्यात येणाऱ्या तक्रारींची संख्या दुपटीने वाढली आहे. केंद्र सरकारची तक्रार निवारण यंत्रणा कार्यक्षम झाल्याचा व लोकांचा विश्वास प्राप्त केल्याचा हा दाखला असल्याचेही सिंह यांनी पीटीआयशी बोलताना नमूद केले आहे.