कार्यकारी अभियंत्याकडे घबाड! ९५ लाखांची रोख; सव्वाकिलो सोने, ३ किलो चांदीच्या विटा सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:48 AM2021-12-19T05:48:50+5:302021-12-19T05:49:35+5:30

बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या मोहिमेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

95 lakh cash to executive engineer gold and 3 kg silver bricks were found in bihar | कार्यकारी अभियंत्याकडे घबाड! ९५ लाखांची रोख; सव्वाकिलो सोने, ३ किलो चांदीच्या विटा सापडल्या

कार्यकारी अभियंत्याकडे घबाड! ९५ लाखांची रोख; सव्वाकिलो सोने, ३ किलो चांदीच्या विटा सापडल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पाटणा :बिहारच्या एका कार्यकारी अभियंत्याच्या घरी दक्षता पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये माेठे घबाड पकडले आहे. कार्यकारी अभियंता अजय कुमार सिंह यांनी जमवलेला पैसा आणि मालमत्ता पाहून पथकातील सदस्यांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली. ९५ लाख रोख आणि सोने-चांदीचे दागिने, इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरकारच्या मोहिमेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याची अनेक प्रकरणे बिहारमध्ये उघडकीस येत आहेत. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. अजयकुमार सिंहने अनेक ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली आहे. त्याबाबत कागदपत्रे आणि विविध बॅंकांमधील खात्यांचे पासबुकही कारवाईदरम्यान सापडले. जमीन आणि सदनिकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना चांदीच्या तीन विटा सापडल्या असून त्यांचे वजन तब्बल ३ किलो आहे. याशिवाय ४ दुचाकीदेखील आढळल्या आहेत. 
 

Web Title: 95 lakh cash to executive engineer gold and 3 kg silver bricks were found in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.