आयटी जॉब करण्यास 95 टक्के इंजिनीअर अपात्र
By admin | Published: April 20, 2017 06:28 PM2017-04-20T18:28:54+5:302017-04-20T18:35:37+5:30
आयटी आणि डाटा सायन्स इकोसिस्टममध्ये भारतातील इंजिनिअर आपले कौशल्य दाखविण्यास अपात्र असल्याचे दिसून आले आहे.
Next
ऑनलाइन लोकतम
नवी दिल्ली, दि. 20 - आयटी आणि डाटा सायन्स इकोसिस्टममध्ये भारतातील इंजिनीअर आपले कौशल्य दाखविण्यास अपात्र असल्याचे दिसून आले आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशातील जवळपास 95 टक्के इंजिनीअर्सची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये नोकरी करण्याची पात्रता नसल्याचे समोर आले आहेत.
एस्पायरिंग माइंड्सने केलेल्या सर्वेनुसार, फक्त 4.77 टक्के उमेदवार प्रोग्रामसाठी योग्य असे लॅजिक लिहू शकतात, जे कोणत्याही आवश्यक प्रोग्रामिंग जॉबसाठी लागू शकेल. देशातील आयटी संबंधीत 500 कॉलेजमधून 36,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्किलच्या ऑटोमेटा मूल्यांकनामध्ये भाग घेतला होता. यामध्ये भाग घेतलेल्या 1.4 टक्के उमेदवारांनी योग्य कोड वापरला, तर 60 टक्के उमेदवारांना योग्य कोड वापरला नाही. यामुळे जवळपास 95 टक्के इंजिनिअर्सची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये नोकरी करण्याची पात्रता नसल्याचे समोर आले आहेत.
प्रोग्रामिंग स्किलची ही कमतरता देशातील आयटी सिस्टमवर प्रभावित करणारी आहे. भारताने स्किल वाढीकडे लक्ष दिले पाहिजे, असे एस्पायरिंग माइंड्सचे सीटीओ आणि सहसंस्थापक वरुण अग्रवाल यांनी सांगितले.