95 टक्के भारतीय "या" आजाराने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:06 PM2017-07-22T14:06:18+5:302017-07-22T14:06:18+5:30
भारतातील जवळपास 95 टक्के भारतीयांना हिरड्यांचा त्रास असल्याचं समोर आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - भारतामध्ये दातांकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. इतकंच नाही तर दातांशी संबंधित समस्यांनाही गंभीरपणे घेतलं जात नाही. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात समोर आलं आहे की, भारतातील जवळपास 95 टक्के भारतीयांना हिरड्यांचा त्रास आहे. 50 टक्के लोक तर टूथब्रशचा वापरही करत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे 15 वर्षाखालील 70 टक्के मुलांचे दात खराब झाले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लोक नियमितपणे दंतचिकित्सक किंवा डेंटिस्टकडे जाण्याऐवजी स्वत: उपचार कऱण्याचा प्रयत्न करत असतात. काही खाद्यपदार्थ आणि पेयांचा त्याग केला तर दातांचा त्रास कमी होईल असा त्यांचा दावा असतो. दातांची सेन्सिटिव्हीटी सर्वात मोठी समस्या असून, या समस्येचा सामना करणा-यांपैकी फक्त चार टक्के लोक डेंटिस्टकडे जाऊन सल्ला घेतात.
आयएमएचे अध्यक्ष के के अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, "तणावाचा दातांवर वाईट परिणाम होतो. तणावात असलेले अनेकजण मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सुरुवात करतात, ज्याचा पुढे जाऊन दातांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अज्ञानामुळे किंवा उपलब्ध माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये दातांची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. शहरांमध्ये जंक फूड आणि वेगळ्या लाईफस्टाईलमुळे दातांच्या समस्या निर्माण होतात. तसंच प्रक्रिया करुन तयार करण्यात आलेल्या जेवणात साखरेचा वापर जास्त असल्याने नवीन पिढीला खासकरुन दातांच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे".
अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, "दातांमध्ये हलकीशी समस्या जरी जाणवत असेल तरी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर डेंटिस्टला भेटलं पाहिजे. दातांचं दुखणं, हिरड्यांमधून रक्त येणं अशा समस्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दूधाच्या बाटलीचा वापर करणा-या लहान मुलांचे पुढील दुधाचे दात अनेकदा खराब होतात. त्यामुळे दूध पाजून झाल्यानंतर आईने साफ कपड्याने मुलाच्या हिरड्या आणि दात पुसले पाहिजेत. जर का दुर्लक्ष केलं तर इन्फेक्शन होऊन हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो.