मनी लाँड्रींगप्रकरणी ९८% गुन्ह्यांची नोंद आठ वर्षांत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 07:23 AM2022-07-28T07:23:44+5:302022-07-28T07:24:06+5:30
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली
शरद गुप्ता
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा-२००२ च्या कायद्यांतर्गत आजवर ५४४२ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील ९८ टक्के म्हणजे ५३१० गुन्ह्यांची नोंद गेल्या आठ वर्षांत करण्यात आली. त्यातील ५० टक्के गुन्हे मागील तीन वर्षांत दाखल करण्यात आले.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यान्वये २०१९-२० या कालावधीत ५६२, २०२१-२२ मध्ये ९८१, २०२१-२२ या कालावधीत ११८० गुन्हे दाखल केले.
या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत मनी लाँड्रिंगच्या ५४४२ प्रकरणांत ईडीने १,०४,७०२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. २०१९ ला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली होती. आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकण्याचे व अटक करण्याचे अधिकार ईडीला देण्यात आले.