महिना 5 हजार कमावणा-या महिलेच्या बँक खात्यात जमा झाले 99 कोटी

By admin | Published: December 26, 2016 08:22 AM2016-12-26T08:22:17+5:302016-12-26T08:22:17+5:30

काही हजारांची उलाढाल असलेल्या बँक खात्यांमध्ये अचानक काही लाख, काही कोटींची उलाढाल झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

99 crore in the bank account of the woman earning 5 thousand | महिना 5 हजार कमावणा-या महिलेच्या बँक खात्यात जमा झाले 99 कोटी

महिना 5 हजार कमावणा-या महिलेच्या बँक खात्यात जमा झाले 99 कोटी

Next

 ऑनलाइन लोकमत 

मेरठ, दि. 26 -  नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही हजारांची उलाढाल असलेल्या बँक खात्यांमध्ये अचानक काही लाख, काही कोटींची उलाढाल झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आता उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये एका महिलेच्या जनधन खात्यामध्ये अचानक 99 कोटी रुपये जमा झाले आहेत. अचानक इतकी रक्कम खात्यावर जमा झाल्यामुळे या महिलेची आणि तिच्या कुटुंबियांची झोप उडाली आहे. 
 
खात्यावर जमा झालेली इतकी रक्कम आपली नसल्याचे या महिलेने बँकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अद्यापपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. या महिलेच्या पतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. शीतल असे या महिलेचे नाव असून मेरठच्या एका कारखान्यात ती महिना पाच हजार रुपयांच्या वेतनावर नोकरी करते. शीतलचे पती जिलेदार सिंह यादवही एका कंपनीत छोटया पदावर नोकरीला आहेत. 
 
18 डिसेंबरला शीतलने आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून स्टेटमेंट काढले. त्यावेळी स्लीपवरील 99 कोटी, 99 लाख, 99 हजार, 394 हा रक्कमेचा आकडा पाहून शीतल चक्रावून गेल्या. शीतल आणि तिच्या पतीने एसबीआय बँकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. शीतलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ई-मेल पाठवून मदत मागितली आहे. 
 

Web Title: 99 crore in the bank account of the woman earning 5 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.