शहरात ९९१ बडे थकबाकीदार मालमत्ता कर: नावे जाहीर होणार

By Admin | Published: February 24, 2016 10:42 PM2016-02-24T22:42:16+5:302016-02-24T22:42:16+5:30

जळगाव : मनपा क्षेत्रात २० हजारापेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेले ९९१ थकबाकीदारा असून त्यांच्याकडे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. कर न भरल्यास या करदात्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

991 Greater Estate Taxes in the City: The names will be announced | शहरात ९९१ बडे थकबाकीदार मालमत्ता कर: नावे जाहीर होणार

शहरात ९९१ बडे थकबाकीदार मालमत्ता कर: नावे जाहीर होणार

googlenewsNext
गाव : मनपा क्षेत्रात २० हजारापेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेले ९९१ थकबाकीदारा असून त्यांच्याकडे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. कर न भरल्यास या करदात्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
महापालिकेवर जिल्हा बॅँक, हुडकोचे कर्ज थकले आहेत. कर्मचार्‍यांचे पगार, थकीत देणी, निवृत्तांची देणी, मक्तेदारांचे देणे अशी प्रचंड देणी थकली आहे. हे लक्षात घेऊन आता मालमत्ता कराच्या थकबाकी वसूलीवर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी मालमत्ता करापोटी ६४ कोटी वसूलीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. ९० हजार मालमत्ताधारकांकडून ही वसूली केली जाणार आहे. त्यासाठी प्रभाग समितीनिहाय थकबाकीच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यात २० हजाराच्या वर ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.
९९१ थकबाकीदार
प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये २० हजाराच्या वर थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची संख्या २४० असून त्यांच्याकडे १ कोटी १ लाख ३७ हजार ५२७, प्रभागी समिती २ मध्ये ४०२ थकबाकीदार असून त्यांच्याकडे १ कोटी ५० लाख ३५ हजार ५३३ रूपये थकबाकी आहे. प्रभाग समिती ३ मधील २३२ थकबाकीदारांकडे १ कोटी ६० लक्ष ३७ हजार ७८३ रूपयांची थकबाकी आहे. तर प्रभाग समिती क्रमांक ४ मधील ११७ मिळकतधारकांकडे ४७ लक्ष ६९ हजार ७९२ रूपयांची थकबाकी आहे. नोटीसा बजावून मालमत्ता कराची देणी भरली न गेल्यास आता या मिळकधारकांची नावे महापालिका जाहीर करणार आहे.

Web Title: 991 Greater Estate Taxes in the City: The names will be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.