१५ वर्षीय मुलगी जळाली, आगीत २५ मिनिटे सुरू मुलीचा आकांत; हृदयद्रावक Video समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 08:25 AM2023-01-09T08:25:52+5:302023-01-09T08:26:05+5:30

अहमदाबाद येथील शाहीबाग भागातील घटना

A 15-year-old girl was burnt, the fire continued for 25 minutes; Ahead of the heartbreaking video | १५ वर्षीय मुलगी जळाली, आगीत २५ मिनिटे सुरू मुलीचा आकांत; हृदयद्रावक Video समोर

१५ वर्षीय मुलगी जळाली, आगीत २५ मिनिटे सुरू मुलीचा आकांत; हृदयद्रावक Video समोर

googlenewsNext

अहमदाबाद : येथील शाहीबाग भागातील एका ११ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागली. यात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 

ही मुलगी २५ मिनिटे बाल्कनीत अडकली होती. मला वाचवा म्हणून लोकांना विनवणी करत होती, पण प्रशासन तिला वाचवू शकले नाही. या घटनेचे हृदयद्रावक व्हिडिओ समोर आले आहेत. कुटुंबातील अन्य चार जण बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

प्रांजल असे या दुर्दैवी मुलीचे  नाव आहे. आर्किड ग्रीन अपार्टमेंटमध्ये आग लागली. घटनेवेळी पाच जण फ्लॅटमध्ये होते. चार जण आगीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर प्रांजल खोलीत अडकली. नंतर ती बाल्कनीकडे गेली व जीव वाचवण्याची विनंती करू लागली. २५ मिनिटे तिचे आर्जव सुरू होते. अग्निशमन दलाचे बंब आले. त्यांनी प्रांजलला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. प्रांजलचा १०० टक्के भाजल्याने मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: A 15-year-old girl was burnt, the fire continued for 25 minutes; Ahead of the heartbreaking video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.