मित्रांसोबत पार्टी करण्यास घरच्यांचा नकार; संतापलेल्या विद्यार्थिनीने केक कापून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 15:53 IST2023-03-05T15:52:49+5:302023-03-05T15:53:27+5:30
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मित्रांसोबत पार्टी करण्यास घरच्यांचा नकार; संतापलेल्या विद्यार्थिनीने केक कापून संपवलं जीवन
आग्रा: उत्तर प्रदेशातीलआग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे काही क्षणांपूर्वी वाढदिवसाच्या आनंदात केक कापत असलेल्या मुलीने आत्महत्या करून जीवन संपवले आहे. तिचा घरच्यांसोबत वाद झाला होता, याच वादातून संबंधित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कमला नगरमध्ये एम.कॉमच्या विद्यार्थिनीने वाढदिवस साजरा केल्यानंतर तिच्या खोलीत दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलीला मित्रांसोबत पार्टीला जायचे होते
दरम्यान, विद्यार्थिनीला पार्टी साजरी करण्यासाठी मित्रांसोबत बाहेर जायचे होते. घरच्यांनी नकार दिल्यानंतर ती संतापली. 22 वर्षीय वंदनाचे वडील नरेंद्र सिंग, कमला नगरचे रहिवासी आहेत. वंदनाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. वंदना ही टेधी बगिया येथील महाविद्यालयात एम.कॉमची विद्यार्थिनी होती. खरं तर 3 मार्च रोजी तिचा वाढदिवस होता. तिने घरातील सदस्य आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत केक कापला. वाढदिवस साजरा करून सर्वजण झोपी गेले असता तिने टोकाचे पाऊल उचलले.
वंदना पहिल्या मजल्यावर तिच्या खोलीत झोपायला गेली. वडील मध्यरात्री कामानिमित्त खोलीत गेले असता वंदना दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. नातेवाईकांनी तिला तातडीने एसएन इमर्जन्सीमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, वंदनाला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचे होते. नातेवाईकांनी नकार दिला याचा तिच्या मनात राग होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"