30 वर्षीय महिलेचे 4 वयोवृद्ध व्यक्तींशी प्रेमसंबंध; पाचव्याने प्रपोज केले, मग भेटायला बोलावले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 08:47 PM2022-12-02T20:47:22+5:302022-12-02T20:59:54+5:30
नालंदातील अस्थानन पोलीस स्टेशन परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका वृद्धाच्या हत्येचे गूढ समोर आले आहे.
नालंदा : नालंदातील अस्थानन पोलीस स्टेशन परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका वृद्धाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी समोर आणले आहे. हत्येचा खुलासा पाहून सर्वांनाच धक्का बसला. या खून प्रकरणातील एकूण 5 आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. डीएसपी डॉ. शिबली नोमानी यांनी सांगितले की, 18/19 ऑक्टोबरच्या रात्री अस्थवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉलिटेक्निक कॉलेजजवळील नव्याने बांधलेल्या कम्युनिटी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता. त्रिपित शर्मा (75 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती अस्तवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवापर या गावातील रहिवाशी होती. याप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा मिठू कुमार याने 21 ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येचा तपास स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.
डीएसपीने सांगितले की, पिनो देवी या 30 वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबंधांमुळे ही हत्या करण्यात आली आहे. खरं तर पिनो देवी (30) ही महिला चहाचे दुकान चालवते. या महिलेच्या नवऱ्याचा आधीच मृत्यू झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे पिनो देवी या महिलेचे 4 वयोवृद्ध पुरूषांशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, ती त्रिपत शर्मा यांच्या देखील संपर्कात आली. त्रिपत शर्मा यांचा पिनो देवीसोबत काही कारणावरून वाद झाला. मग चिडलेल्या पिनो देवी या महिलेने त्रिपत शर्मा यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. तिने मृत्यू झालेल्या त्रिपत शर्मा यांना भेटण्यासाठी नव्याने बांधलेल्या कम्युनिटी हॉलमध्ये बोलावले होते. पिनो देवीने बोलावल्यानंतर त्रिताप शर्मा तिथे पोहोचल्यावर आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. नंतर ढकलून टॉयलेटच्या टाकीत टाकले. पोलिसांनी आरोपींकडून मृत त्रिपत शर्मा यांचा मोबाईलही जप्त केला आहे.
पोलिसांनी 5 आरोपींना केली अटक
आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पिनो देवी (30), कृष्णा नंदन प्रसाद अशा आरोपींचा समावेश आहे. याशिवाय अस्तवन पोलिस स्टेशन हद्दीतील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ राहणारा सूर्यमणी कुमार, मानपूर पोलिस स्टेशन हद्दीतील छबिलापूर गावचा रहिवासी वासुदेव पासवान आणि अस्तवन पोलिस स्टेशन हद्दीतील अकबरपूर गावचा रहिवासी बनारस प्रसाद उर्फ लोहा सिंह यांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी एकूण 5 आरोपींना अटक केली आहे.