दीड लाख वर्षांनी आजच्या रात्री मोठी पर्वणी; सूर्याच्या तावडीतून निसटलेला धुमकेतू दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:49 IST2025-01-13T16:49:02+5:302025-01-13T16:49:16+5:30
नासाच्या एटलास सिस्टीमध्ये गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या धुमकेतूचा शोध लावला होता. सुरुवातीला हा धुमकेतू सूर्याच्या जवळ असल्याने नष्ट होईल असे वाटले होते.

दीड लाख वर्षांनी आजच्या रात्री मोठी पर्वणी; सूर्याच्या तावडीतून निसटलेला धुमकेतू दिसणार
आज रात्री एक मोठी पर्वणी येऊ घातली आहे. हजारो वर्षांतून एकदाच दिसणारा धुमकेतू आजच्या रात्री दिसणार आहे. हा धुमकेतू उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. कोणाकडे दुर्बिन असली तर तिचा वापर करूनही हा धुमकेतू पाहता येणार आहे. १३ जानेवारीला रात्री हा धुमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळ असणार आहे. जवळपास दीड लाख वर्षांनी हा धुमकेतू दिसणार आहे.
C/2024 G3 (ATLAS) असे या धुमकेतूला नाव देण्यात आले आहे. हा धुमकेतू १४ जानेवारीपर्यंत दिसणार आहे. नासाच्या एटलास सिस्टीमध्ये गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या धुमकेतूचा शोध लावला होता. सुरुवातीला हा धुमकेतू सूर्याच्या जवळ असल्याने नष्ट होईल असे वाटले होते. परंतू, त्याची भ्रमण कक्षा पाहिल्यानंतर हा धुमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचे व सूर्यापासून याला १.६० वर्षांची कक्षा वाचवत असल्याचे लक्षात आले होते.
अखेर आज तो दिवस आला आहे. सूर्याच्या जवळ जाणारा धुमकेतू तुटतो, परंतू हा जास्त प्रकाशमान होत आहे. त्याचा प्रकाश कमी होत नाहीय. याचा अर्थ हो सहीसलामत आहे. जर हा धुमकेतू सूर्याजवळ जाऊनही वाचला तर तो शुक्र ग्रहाएवढा प्रकाशमान होणार आहे.
कधी दिसणार...
भारतीय वेळेनुसार हा धुमकेतू १३ जानेवारीला दुपारी ३.४७ मिनिटांनी सूर्याच्या अगदी जवळ असणार आहे. याचवेळी तो पृथ्वीच्या जवळूनही जाणार आहे. हा धुमकेतू सूर्यास्तानंतर अर्धा तास आणि सूर्योदयापूर्वी अर्धा तास असा पाहता येणार आहे. प्रदुषण, धुरके नसेल तर हा धुमकेतू पाहता येणार आहे.