LPG Price Hike:सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, आता एका सिलेंडरसाठी मोजावे लागतील एवढे रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:39 AM2022-07-06T09:39:01+5:302022-07-06T09:39:35+5:30

LPG Gas Cylinder Price Hike: घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आता आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे.

A big shock to the common man, a big increase in the price of domestic gas cylinders, now the price that has to be paid for one cylinder | LPG Price Hike:सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, आता एका सिलेंडरसाठी मोजावे लागतील एवढे रुपये 

LPG Price Hike:सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, आता एका सिलेंडरसाठी मोजावे लागतील एवढे रुपये 

googlenewsNext

मुंबई - घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आता आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील चार मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये एका सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये, तर चेन्नईमध्ये १०६८.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

एकीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घसघशीत वाढ करण्यात आली असली तरी कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत मात्र कपात करण्यात आली आहे. १ जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत १९८ रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर आता घरगुती सिलेंडरचे भावही कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र कंपन्यांनी सामान्य ग्राहकांना झटका देत भाव वाढवले. तर कमर्शियल सिलेंडर मात्र अजून आठ रुपयांनी स्वस्त केला आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडर हा १९७२ रुपयांना मिळेल.

गेल्या महिनाभरात कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे सव्वा तीनशे रुपयांहून अधिकची कपात झाली आहे. १ जून रोजी कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत १३५ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर १ जुलै रोजी २०० रुपयांची कपात झाली होती. तर आज अजून ८ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

दरम्यान, महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडरमागे २०० रुपये सब्सिडी देण्याची घोषणा केली होती. ही सब्सिडी दरवर्षी १२ सिलेंडरवर मिळणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा हा ९ कोटी ग्राहकांना होणार आहे.  

Web Title: A big shock to the common man, a big increase in the price of domestic gas cylinders, now the price that has to be paid for one cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.