घबाडापेक्षा मोठे घबाड हाती लागले! इंजिनिअरच्या ४० ठिकाणांवर छापे, ५५ प्लॉट्स अन् बरेच काही; गिफ्ट डीड बनवून घ्यायचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:07 IST2025-03-11T13:07:26+5:302025-03-11T13:07:46+5:30
राजस्थानच्या एसीबीने एक मोहिम राबविली आहे, असे खाऊन खाऊन गबरू पैलवान बनलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची ओळख पटवायची आणि त्यांचा भांडाफोड करायचेच एसीबीने हाती घेतले आहे.

घबाडापेक्षा मोठे घबाड हाती लागले! इंजिनिअरच्या ४० ठिकाणांवर छापे, ५५ प्लॉट्स अन् बरेच काही; गिफ्ट डीड बनवून घ्यायचा...
देशात किती प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे, याचे मूर्तीमंत उदाहरण अनेकदा सरकारी यंत्रणांनी मारलेल्या छाप्यांतून उघड होते. सरकारी नोकरीत लागल्यापासून काही काळातच हे सरकारी नोकरदार करोडोत खेळू लागतात. श्रीमंतांकडून पैसे काढले तर काय होते, अशा कहाण्या अनेकदा तुम्ही चित्रपटांतून ऐकल्या असतील, पण हे लोक प्रत्येक्षात गरीबातल्या गरीबालाही सोडत नाहीत. गरिबांसाठी बांधल्या जाणाऱ्या आवास योजनेतही ते पैसे खातात. असाच एक गबरू इंजिनिअर सापडला आहे.
राजस्थाानच्या एसीबीने एक मोहिम राबविली आहे, असे खाऊन खाऊन गबरू पैलवान बनलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची ओळख पटवायची आणि त्यांचा भांडाफोड करायचेच एसीबीने हाती घेतले आहे. यानुसार जयपूर विकास प्राधिकरणाचे इंजिनिअर अविनाश शर्मा यांच्या तब्बल ४० ठिकानांवर छापे मारले आहेत. सुमारे डझनभर टीम या कामी लागली आहेत. जेडीएच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात आहे.
शर्मा यांनी सरकारी नोकरीत नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंत ६.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविली आहे. हे प्रमाण अधिकृत उत्पन्नापेक्षा २५३ टक्के जास्त आहे. त्यांच्याकडे आतापर्यंत सात बँकांमध्ये खाते आणि लॉकर आहेत, असे समजले आहे. अद्याप याची मोजदाद सुरु आहे, असे एसीबीने सांगितले आहे.
या अधिकाऱ्याने जयपूरच्या आजुबाजुच्या भागात २५ हून अधिक कॉलनींमध्ये ५० हून अधिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तसेच या जागांवर मालमत्ता उभी करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. त्याने पदावर राहून मोठमोठ्या बिल़्डरना लाभ दिला आहे. बदल्यात गिफ्ट म्हणून हे प्लॉट कमी किंमत दाखवून नावावर करून घेतले आहेत. या प्लॉटची बाजारातील किंमत ही करोडोंमध्ये आहे. त्याच्या नावावर ३० लाख रुपये जमा आहेत. मुलींच्या शिक्षणावर ५० लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच म्युच्युअल फंडात ९० लाख रुपये आणि कार, दुचाकींसाठी त्याने २५ लाख रुपये खर्च केले आहेत.