संतापजनक! लग्नाला देत होता नकार; प्रेयसीने जबरदस्तीने प्रियकराला सांगून सख्ख्या भावाची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:22 PM2022-12-12T14:22:34+5:302022-12-12T15:03:41+5:30
राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील गंगरार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे सुमारे 200 फूट खोल विहिरीत अज्ञात व्यक्तीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला होता. महेंद्र रायका असे मृतदेहाचे नाव असल्याचे सुरूवातीला समोर आले. मात्र विहिरीतून मृतदेह बाहेर काढत असताना एक व्यक्ती पोलिसांना न विचारता त्यांची मदत करत होता. त्याने आपले नाव महावीर धोबी असल्याचे सांगितले.
दरम्यान, संबंधित तरूण मृतदेह स्वच्छ देखील करू लागला. मृत व्यक्तीच्या हातावर काहीतरी लिहले होते, जे कमलेश रायका असल्याचे पोलिसांना वाटले परंतु, पोलिसांची मदत करत असलेल्या महावीरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक तो कमलेश नसून हे नाव महेंद्र रायका असल्याचे त्याने सांगितले. त्याचवेळी पोलिसांना महावीरवर संशय आला. त्याच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आणि नंतर त्याने हत्येचे संपूर्ण रहस्य सांगितले.
प्रियकराने केला धक्कादायक खुलासा
SHO शिवलाल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान महावीर धोबीने अनेक धक्कादायक खुलासे केले. "आपल्याला ही हत्या करायची नव्हती मात्र मृत तरूणाची बहिण तनु ही माझी प्रेयसी आहे आणि तिलाच मृत कमलेश रायकाला आमच्या लग्नासाठी राजी करायचे होते. मी तनुला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही आणि महेंद्रला मारण्यासाठी दबाव टाकत राहिली", असे हत्या करणाऱ्या महावीरने सांगितले. मृत महेंद्र रायका हा आई आणि दोन बहिणींसोबत त्याचे मामा शांतीलाल यांच्या घरी राहत होता. जवळच महावीरचे घर होते. महावीर महेंद्रच्या घरी सतत यायचा. यादरम्यान, महावीर आणि तनु यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. महावीर आणि तनुष्का दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते."
3 वर्षांपासून सुरू होते प्रेमसंबंध
मागील तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते आणि दोघांनाही लग्न करायचे होते मात्र घरच्यांनी तिचे लग्न उज्जैन येथील एका व्यक्तीशी ठरवले होते. हा विवाह अट्टाहासाने होत होता. यामुळे व्यथित झालेली प्रेयसी तनु ही तिचा प्रियकर महावीरवर दबाव टाकत होती. प्रेयसीच्या प्रेमापोटी महावीरने मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या भावाची हत्या केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रियकर महावीरने तनुकडून घेतले होते 40 हजार रूपये
प्रियकर महावीरने आपल्या बहिणीकडून 40 हजार रूपये घेतले असल्याची माहिची मृत महेंद्रला मिळाली होती असे तपासात समोर आले आहे. महेंद्र महावीरला सतत त्याच्या घरी येण्यापासून रोखत होता. यासोबतच तो बहिणीकडेही पैशांची मागणी करत होता. अशा स्थितीत पैसे देऊन लग्नही करावे लागत नसल्याने महावीरने महेंद्रची हत्या केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"