Video: मंदिरातले दागिने चोरले, देवाने तिथेच दिली शिक्षा; पाहा नेमकं काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:38 PM2022-04-06T19:38:30+5:302022-04-06T19:44:47+5:30

दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने चोर मंदिरात शिरला, पण त्याला बाहेर पडता आले नाही. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.

A burglar trapped in hole who tried to steal in Jami Yellamma Temple | Video: मंदिरातले दागिने चोरले, देवाने तिथेच दिली शिक्षा; पाहा नेमकं काय घडलं...

Video: मंदिरातले दागिने चोरले, देवाने तिथेच दिली शिक्षा; पाहा नेमकं काय घडलं...

googlenewsNext

श्रीकाकुलम: असे म्हणतात की, देव सर्व पाहत असतो. गुन्हे किंवा पाप करणाऱ्यांना देव योग्यवेळी शिक्षा देतो. असेच एक प्रकरण आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातून समोर आले आहे. मंदिरात चोरी करायला आलेल्या चोरट्याला देवाने जितल्या तिथे शिक्षा दिली. त्याला मिळालेल्या शिक्षेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?
पापा राव(वय 30) असे चोरट्याचे नाव आहे. पापा राव याला दारुचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने येथील जामी येल्लम्मा(स्थानिक देवता) च्या मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. मंदिराच्या मुख्य दाराला कुलूप लावले असल्याने त्याने भिंतीमध्ये एक छोटेसे भगदाड(खिडकी) पाडले. 

दागिने चोरल्यानंतर बाहेर पडता आले नाही
या भगडादातून त्याने मंदिरात प्रवेश केला. चोरट्याने मंदिरातून सूमारे 20 ग्रॅम चांदीचे दागिने चोरले. पण, त्याला मंदिरातून बाहेर पडता आले नाही. ज्या खिडकीतून तो आत शिरला होता, त्या खिडतीत तो अडकून पडला. यानंतर त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला असता स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्याला तशा विचित्र अवस्थेत पाहून लोकांना संपूर्ण प्रकार समजला.

व्हिडिओ झाला व्हायरल
स्थानिकांनी त्याला कसेबसे त्या खिडकीतून बाहेर काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पापारावने दारुचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने यापूर्वी स्वतःच्याच घरातून एलपीजी सिलिंडर चोरुन विकला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: A burglar trapped in hole who tried to steal in Jami Yellamma Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.