फोन आला, कर्जाचा बहाणा सांगितला; विद्यार्थ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली अन् पुढे घडले ते भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:32 PM2024-08-30T15:32:36+5:302024-08-30T15:33:04+5:30

संबंधित विद्यार्थ्याच्या ओळखीचे डॉक्टर दाम्पत्य आणि दोन मित्रांचे फोटो एडिट करून व्हायरल केले.

A call came from a Pakistani number and a student studying engineering in Indore, Madhya Pradesh was cheated  | फोन आला, कर्जाचा बहाणा सांगितला; विद्यार्थ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली अन् पुढे घडले ते भयंकर

फोन आला, कर्जाचा बहाणा सांगितला; विद्यार्थ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली अन् पुढे घडले ते भयंकर

पाकिस्तानच्या नंबरवरुन अज्ञात व्यक्तीचा आलेला कॉल उचलणे भारतीय विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले. मध्य प्रदेशातील इंदूरमधील २४ वर्षीय विद्यार्थ्याची फसवणूक झाली अन् एकच खळबळ माजली. आरोपीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या संबंधित विद्यार्थ्याच्या ओळखीचे डॉक्टर दाम्पत्य आणि दोन मित्रांचे फोटो एडिट करून व्हायरल केले. संबंधित विद्यार्थ्याला पाकिस्तानच्या नंबरवरुन फोन आला होता. यामाध्यमातून कॉलरने त्याच्याकडे पैसे मागितले. पण, विद्यार्थ्याने नकार कळवल्यानंतर कॉल केलेल्या व्यक्तीने पीडित विद्यार्थ्याच्या संपर्कातील क्रमांकावर एडिट केलेले अश्लील फोटो पाठवले. याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त राकेश गुप्ता यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली.

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ऋषी वाजपेयीने सांगितले की, त्याला १६ ऑगस्टला पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला होता. पोलिसांचा डीपी असल्याचे पाहून त्याने फोन उचलला. फोन करणारा व्यक्ती म्हणाला की, ऋषी, तू ३५ लाखांचे कर्ज घेतले होते, ते आजपर्यंत का फेडले नाहीस? सेटलमेंटसाठी सुमारे २० हजार रुपये दे आणि उरलेले पैसे नंतर दिले तरी चालतील. मात्र, ऋषीने कोणतेही कर्ज घेतले नसल्याचे सांगून फोन ठेवला.

विद्यार्थ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक
दरम्यान, दोन दिवसांनी घडलेल्या घटनेने ऋषीला धक्का बसला. कारण दोन दिवसांनी ऋषीची कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक झाली होती. आरोपीने त्याच्या डीपीमधून ऋषीचा चेहरा वगळला आणि महिलेच्या फोटोसह एडिट केला. त्याच्या संपर्कातील सर्व फोन नंबरवर हे अश्लील फोटो पाठवले. यानंतर अज्ञात आरोपीने डॉक्टर दाम्पत्य आणि ऋषीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील दोन मित्रांचा व्हॉट्सॲप डीपीही एडिट करून त्याच पाकिस्तानी नंबरवरून व्हायरल केला. याशिवाय ऋषीच्या नंबरवरुनही अश्लील फोटो पाठवण्यात आले. आरोपीने कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या इतर लोकांना फोन करून पैशांची मागणी केली आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर ऋषीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलिसांनी सांगितले की, सेक्सटोर्शनपेक्षा हे वेगळे प्रकरण आहे.

ऋषीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एका ऑर्थोपेडिक डॉक्टरचा नंबर होता. हॅकरने डीपीमधून डॉक्टरांचा फोटो काढून पॉर्न स्टारशी जोडला. डॉक्टरांच्या पत्नीचा फोटोही एका पुरुष पॉर्न स्टारसोबत जोडून व्हायरल करण्यात आला होता. तसेच आरोपींनी कॉन्टॅक्ट लिस्टमधून ऋषीच्या मुस्लिम मित्राचा फोटो काढला आणि गुजरातमधील गरबा खेळणाऱ्या मुलीसोबतचा त्याचा फोटो आक्षेपार्ह स्थितीत एडिट करून व्हायरल केला. 

Web Title: A call came from a Pakistani number and a student studying engineering in Indore, Madhya Pradesh was cheated 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.