राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 05:28 PM2023-01-05T17:28:03+5:302023-01-05T17:28:46+5:30

Wrong Number Love Story: मप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका राँग नंबरपासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

A call from a wrong number, an infatuated mother of 3 leaves home and reaches Chennai, after which... | राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर...

राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर...

Next

रांची - झारखंडमधील पलामू जिल्ह्यामधून प्रेमप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका राँग नंबरपासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मेदिनानगर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक तीन मुलांची आई राँग नंबरवरून आलेल्या फोननंतर प्रेमात पडली. या प्रेमाची नशा दिवसेंदिवस एवढी वाढत गेली की, तिने मुलं आणि पतीला सोडून पुढच्या जीवनात प्रियकरासोबत नवा संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

या महिलेच्या मोबाईलवर ऑक्टोबर महिन्यामध्ये राँग नंबरवरून एका तरुणाचा फोन आला होता. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दिवसागणिक हे बोलणं वाढत गेलं  आणि प्रेमही अधिक दृढ झालं. अखेरीस या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. 
मात्र आपल्या संसारात काय सुरू आहे, याची साधी कुणकुणही पतीला लागली नव्हती. एकेदिवशी अचानक ही महिला गायब झाली. त्यामुळे चिंतेत पडलेल्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच माझ्या पतीला शोधा अशी विनवणी पोलिसांकडे केली.

त्यानंतर मेदिनीनगर सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तपासास सुरुवात केली. खूप शोधाशोध केल्यावर एक आठवड्यापूर्वी सदर महिला ही चेन्नईमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर महिला आणि तिच्या प्रियकराशी फोनवरून संपर्क साधून त्यांना पलामू येथे येण्यास सांगितले.  बुधवारी दोघेही मेदिनीनगर सदर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यानंतर या महिलेच्या पतीलाही बोलावण्यात आले. तोसुद्धा कुटुंबासह तिथे आला. तिथे पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहून त्याला धक्का बसला.

मेदिनीनगर सदर ठाण्याचे प्रभारी गौतम कुमार यांनी सांगितले की, सदर महिला ही तिच्या प्रियकरासोबत राहण्यावर अडून बसली होती. मात्र तिचा पती तिला सोडण्यास तयार नव्हता. महिलेचा प्रियकर तिच्यासोबत राहण्यास तयार होता. अशा परिस्थितीत सर्वांच्या सहमतीने अखेर या महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात आले. तिचा हा प्रियकर चेन्नईमध्ये राहतो.  

Web Title: A call from a wrong number, an infatuated mother of 3 leaves home and reaches Chennai, after which...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.