काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 08:14 IST2024-04-14T08:14:27+5:302024-04-14T08:14:46+5:30
कारमधून जप्त करण्यात आलेली राेख रक्कम व इतर मुद्देमाल निवडणूक आयाेगाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.

काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त
बंगळुरू: निवडणूक आयाेगाच्या पथकाने बंगळुरू शहरातील जयनगर भागात दाेन बेवारस कार आणि एका माेटरसायकलमधून काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या कारवाईदरम्यान ५ जण पळून गेले. पथकाने काचा फाेडून कारच्या आत ठेवलेली राेख रक्कम ताब्यात घेतली.
या वाहनांसंदर्भात गुप्त माहिती प्राप्त झाली हाेती. या गाड्यांच्या मालकांचा शाेध घेण्यात येत आहे. रक्कम माेजण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू हाेते. याशिवाय आयकर खात्यानेही तपास सुरू केला आहे. कारमधून माेबाईल फाेन व इतर कागदपत्रेदेखील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.