लिपिकाने 32 वर्षांपूर्वी 100 रुपयांची लाच घेतली; आता 89 व्या वर्षी कोर्टाने शिक्षा सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:01 PM2023-02-03T21:01:35+5:302023-02-03T21:01:42+5:30

लखनौमध्ये एका लिपिकाला 100 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

A clerk took a bribe of Rs 100 32 years ago; Now at the age of 89, the court sentenced him | लिपिकाने 32 वर्षांपूर्वी 100 रुपयांची लाच घेतली; आता 89 व्या वर्षी कोर्टाने शिक्षा सुनावली

लिपिकाने 32 वर्षांपूर्वी 100 रुपयांची लाच घेतली; आता 89 व्या वर्षी कोर्टाने शिक्षा सुनावली

googlenewsNext


लखनौ: लखनौमध्ये लाच घेतल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याला 32 वर्षानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयाने 32 वर्षांपूर्वी 100 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रेल्वे विभागातील मुख्य लिपिकाला दोषी ठरवले आहे. या शिक्षेसाठी त्याला एक वर्षाचा कारावासही भोगावा लागणार आहे. शिक्षेसोबतच दोषीला 15,000 रुपयांचा दंडही ठोठावला.

आरोपीचे वय 89 वर्षे
विशेष म्हणजे, या लिपिकाचे वय आता 89 वर्षे आहे. या संपूर्ण प्रकरणात तक्रारदाराचाही मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या वकिलानुसार, आलमबाग लोको फोरमॅनच्या कार्यालयात नियुक्त लोको पायलट राम तिवारी यांनी 6 ऑगस्ट 1991 रोजी एसपी सीबीआयकडे तक्रार केली होती की, पेन्शनच्या कामासाठी 19 जुलै 1991 रोजी त्यांची उत्तर रेल्वे रुग्णालयात नियुक्त मुख्य लिपिक आर एन वर्मा यांची भेट घेतली. आरएन वर्मा यांनी लवकर वैद्यकीय उपचार करण्याच्या नावाखाली 150 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. 

नेमकं काय झालं
तक्रारदार अत्यंत गरीब होता. कसेबसे त्याने 50 रुपये दिले होते. मात्र आरोपींनी 100 रुपये न देता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यामुळे व्यथित होऊन पीडित रामकुमार तिवारी यांनी या प्रकरणाची तक्रार सीबीआय पोलिस अधीक्षकांकडे केली होती. पोलिस अधीक्षकांच्या वतीने तक्रारदार रामकुमार तिवारी यांना 50-50 रुपयांच्या दोन नोटा देण्यात आल्या आणि लाचेची मागणी करणाऱ्या बाबू आर.एन. वर्माला जवळच्या ढाब्यावर बोलवण्यास सांगण्यात आले. ढाब्यावर सीबीआयच्या पथकाने आरएन वर्माला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

तक्रारदाराचा मृत्यू

एवढी वर्षे न्यायालयात प्रकरण सुरू असल्याने आणि तारखेनंतर तारखा मिळत असल्याने तक्रारदाराचाही मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर वयाच्या या टप्प्यावर आरोपीने हे प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात अपीलही केले आहे. त्यावर हायकोर्टाने विशेष सीबीआय कोर्टाला 6 महिन्यांत खटला निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआय न्यायालयाच्या वतीने निकाल देताना म्हटले की, आरोपीचे वय आणि लाचेची रक्कम लक्षात घेता हे प्रकरण फार मोठे नाही. मात्र 32 वर्षांपूर्वी 100 रुपयांची रक्कम गरजूंसाठी खूप होती. आरोपीला शिक्षा झाली नाही तर समाजात त्याचा विपरीत परिणाम होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: A clerk took a bribe of Rs 100 32 years ago; Now at the age of 89, the court sentenced him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.