जखमी नाविकाला वाचवण्यासाठी अरबी समुद्रात गेलेलं कोस्टगार्डचं चॉपर दुर्घटनाग्रस्त, तीन जण बेपत्ता  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:45 PM2024-09-03T12:45:00+5:302024-09-03T12:45:33+5:30

Coast Guard Chopper Crash: गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला (आयसीजी) एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. तेव्हापासून या हेलिकॉप्टरमधील चालक दलाचे तीन सदस्य बेपत्ता आहेत.

A Coast Guard chopper that went to the Arabian Sea to rescue an injured sailor crashes, three people are missing   | जखमी नाविकाला वाचवण्यासाठी अरबी समुद्रात गेलेलं कोस्टगार्डचं चॉपर दुर्घटनाग्रस्त, तीन जण बेपत्ता  

जखमी नाविकाला वाचवण्यासाठी अरबी समुद्रात गेलेलं कोस्टगार्डचं चॉपर दुर्घटनाग्रस्त, तीन जण बेपत्ता  

गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला (आयसीजी) एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. तेव्हापासून या हेलिकॉप्टरमधील चालक दलाचे तीन सदस्य बेपत्ता आहेत. एका टँकरवरील जखमी सदस्याच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर समुद्रात गेले होते. मात्र ते स्वत:च अपघातग्रस्त झाले. दरम्यान, समुद्रात बेपत्ता झालेल्या ३ सदस्यांचा शोध घेतला जात आहे. 

या दुर्घटनेबाबत तटरक्षक दलाने सांगितले की,  पोरबंदरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर असलेल्या हरी लीला या मोटार टँकरवरील गंभीर जखमी असलेल्या एका नाविकाच्या मदतीसाठी रात्री ११ वाजता एका अल्टा लाईट हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. चालक दलाचे चार सदस्य स्वार झालेल्या या हेलिकॉप्टरचं समुद्रामध्ये एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. यादरम्यान हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं. 

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरच्या चालक दलामधील एका चालकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. तसेच दुर्गटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले आहेत. मदत आणि बचाव कार्यामध्ये ४ जहाजे आणि २ विमानांना तैनात करण्यात आलं आहे. 

एकीकडे गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडवला असतानाच ही दुर्घटना घडली आहे. गुजरातमधील मदत आणि बचाव कार्यामध्ये तटरक्षक दलही गुंतले आहे. तटरक्षक दलासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, भारतीय लष्कर, भारतील हवाई दल, यांनीही पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं आहे.   

Web Title: A Coast Guard chopper that went to the Arabian Sea to rescue an injured sailor crashes, three people are missing  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.