साखरेच्या एका निर्णयामुळे १२ टक्क्यांनी वाढली संपत्ती; इथेनॉल निर्मितीला परवानगीने कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:53 AM2023-12-19T06:53:58+5:302023-12-19T06:54:08+5:30
सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर पुन्हा इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस पुन्हा परवानगी दिल्याने उत्पादक कंपन्यांच्या समभागांत शनिवारी १२ टक्के वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांचा लाभ झाला आहे. एका कंपनीच्या समभागास तर अपर सर्किटही लागले.
७ डिसेंबर रोजी सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर पुन्हा इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आली. त्याचा लाभ कंपन्यांच्या समभागांना झाला.
कंपनी तेजी सध्याची किंमत (रु.)
धामपूर शुग मिल्स १२.५% २७९
बजाज हिंदुस्थान शुगर १०% ३०.७५
उत्तम शुगर मिल्स १०% ४४०
रेणुका शुगर्स ९% ५०.९०
मगध अँड एनर्जी ९% ७४४.८०
बलरामपूर चिनी मिल्स ७.७% ४१४
डालमिया भारत शुगर ७.५% ४३०
अवध शुगर अँड एनर्जी ७% ७३९
मवाना शुगर्स ६% १०२.१०
महाराष्ट्राची बाजी; २४.८५ लाख टन उत्पादन
कोल्हापूर : ‘अल् निनो’चा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांनी साखर उत्पादनातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात २४.८५ लाख टन, उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन, तर कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले.